Mahayuti Clash : महायुतीत ठिणगी! गणेश नाईकांसमोरच भाजप-शिंदेंची शिवसेना आमनेसामने; जिल्हाध्यक्ष अन् आमदाराच्या खडाजंगींचा व्हिडिओ व्हायरल

BJP Bharat Rajput and Shivsena MLA Rajendra Gavit Clash in Palghar पालघरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्यात व्यासपीठावरच खडाजंगी झाली आहे.
Palghar Mahayuti internal political dispute
Palghar Mahayuti internal political disputeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Palghar BJP Shivsena Leader Clash News : पालघरमध्ये आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार राजेंद्र गावित यांच्यात जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे. वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीतच दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर गणेश नाईक यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत झाला. मात्र, आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने पालघरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महायुतीतील घटक पक्षांमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

'तुम्ही व्यासपीठावर का आलात?'

पालघरमध्ये आयोजित खासदार क्रीडा महोत्सव हा भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे) आमदार राजेंद्र गावित यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी गावित यांना थेट डिवचत, 'तुम्ही व्यासपीठावर का आलात?' असा सवाल केल्याची माहिती आहे.

यावर पालकमंत्री गणेश नाईक आणि खासदार यांनी निमंत्रण दिल्यामुळे आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे राजेंद्र गावित यांनी उत्तर दिले. यानंतर दोघांमध्ये वाद वाढल्याचे समोर आले. या वादावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

Palghar Mahayuti internal political dispute
Rajendra Gavit: दोन लग्न केलेल्या भाजपच्या आमदाराला हायकोर्टाचा दिलासा; निकालात काय म्हटलंय?

रिलीफ हॉस्पिटल राडा प्रकरणावरूनही आरोप-प्रत्यारोप

दरम्यान, या वादाचे पडसाद पालघरमधील रिलीफ हॉस्पिटल येथे झालेल्या राडा प्रकरणाशी जोडले जात असल्याचा आरोप आमदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. रिलीफ हॉस्पिटलमधील प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अडकवल्याचा आरोप गावित यांनी केला. या प्रकरणात आपल्या मुलालाही गुंतवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पालघरमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय आहे रिलीफ हॉस्पिटल राडा प्रकरण?

दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारांच्या बिलावरून पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या घटनेत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तसेच हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित राजेंद्र गावित याच्यासह २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रोहित गावित याला मीरा रोड येथून पोलिसांनी ताब्यात घेत पालघर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. पालघर न्यायालयाने यापूर्वी रोहित गावित यांचा जामीन अर्जही फेटाळला आहे.

Palghar Mahayuti internal political dispute
Palghar Hospital Case : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिंदेंच्या आमदारपुत्राला दणका! डॉक्टर मारहाणप्रकरणात सहा जणांचे जामीन रद्द

दोषमुक्त करण्यासाठी रोहित गावित यांचा अर्ज

या रिलीफ हॉस्पिटल राडा प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी रोहित गावित यांनी स्थानिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनावणी होणार आहे. रिलीफ हॉस्पिटल राडा प्रकरण, त्यानंतरचे आरोप-प्रत्यारोप आणि आता खासदार क्रीडा महोत्सवातील वाद यामुळे पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा उघडपणे समोर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.