Raigad ZP : ZP विषय समितींच्या सभापतींचे आज खातेवाटप; वजनदार खात्यांसह अर्थ-बांधकामसाठी सत्ताधारी महायुतीतच रस्सीखेच

Raigad ZP committee chairman allocation : रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आली असून अद्याप सत्ता वाटप झालेले नाही. दरम्यान आज मंगळवारी (७एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सभापतींचे खातेवाटप करण्यात येणार आहे.
raigad zilla parishad
raigad zilla parishadsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा परिषदेत समिती सभापतींच्या पदासाठी महायुतीत रस्सीखेच

  2. अर्थ व बांधकाम खाते कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

  3. आजच्या सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Raigad ZP News : रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आली असून अद्याप विषय समित्यांच्या सभापतींचे खातेवाटप झालेले नाही. अर्थ व बांधकाम खात्यावरुन सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्यचे जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर जिल्हा परिषदेतील हे 'मलाईदार' खाते कोणाकडे जाणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले असून याचा निर्णय आज मंगळवारी (७एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट होणार आहे. दरम्यान भाजपचे वैकुंठ पाटील, शिवसेनेचे सभापती चंद्रकांत कळंबे आणि उपाध्यक्ष मधुकर पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या २३ मार्चला झालेल्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत इतर समित्यांचे वाटप करण्यात आले आहे. याआधी महिला व बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या तर राष्ट्रवादीला समाज कल्याण सभापतीपद देण्यात आले आहे. पण उर्वरित अर्थ-बांधकाम तसेच शिक्षण व कृषी सभापती या महत्वाच्या दोन पदांबाबत निर्णय झाला नव्हता. जो आजच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मार्गी लागणार आहे.

विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत दोन सभापती पदे शिवसेनेच्या वाट्याला आली तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एकेक सभापती पद राहिले. यात शिवसेनेच्या रसिका केणी, चंद्रकांत कळंबे, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांचा समावेश आहे. शिवाय उपाध्यक्षांकडे देखील विषय समिती सभापतीपद राहणार आहे.शिवसेनेच्या रसिका केणी यांच्याकडे महिला बालविकास विभागाचे सभापतीपद आले असून समाजकल्याण सभापतीपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारायण डामसे यांच्या गळ्यात पडली आहे.

raigad zilla parishad
Raigad ZP : रायगडमध्ये भाजपचे धक्कातंत्र! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून ZP अध्यक्षांच्या नावाची घोषणा; ऐनवेळी कार्यकालही बदलला

दरम्यान आता अर्थ व बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप आज होणार आहे. अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती पदाकरिता शिवसेना अग्रही असून चंद्रकांत कळंबे यांचे नाव पुढे येत आहे. तर याच पदासाठी भाजपचे वैकुंठ पाटील ही आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान उपाध्यक्ष मधुकर पाटील यांचेही नाव आता समोर येत असल्याने कोण सभापती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात महायुती असतानाही जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी आणि भाजपने, शिवसेनेनं वेगळ्या चुली मांडल्या. शिवसेनेने स्वतंत्र लढत देत २१ सदस्य निवडून आपली ताकद दाखवली तर राष्ट्रवादीला १६ आणि भाजपला १५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतरच महायुतीत महाभारत घडत गेले. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे सत्तास्थापनेत पेच निर्माण झाला होता. मात्र अंतिमतः महायुतीची सत्ता स्थापन झाली. पण सत्ता समीकरणे जुळवताना शिवसेनेला तडजोडी कराव्या लागल्याचे समोर आले.

सत्तावाटपाचा फार्म्युला ठरवताना अध्यक्षपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचे सूत्र ठरले असून, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना अनुक्रमे संधी मिळणार आहे. तर प्रत्येक पक्षाला दोन सभापती पदेही मिळणार आहे. मात्र अर्थ व बांधकाम या महत्त्वाच्या खात्याच्या सभापती पदावर एकमत झाले नव्हते. ज्याची राजकीय वर्तुळात अशी चर्चा झाली होती.

सहसा अर्थ व बांधकाम हे पद उपाध्यक्षांकडे दिले जाते यामुळे ते रोहा येथील मधुकर पाटील यांच्याकडे जाईल असे बोलले जात होते. तरीही शिवसेनेनं आपली ताकद दाखवत ते आपल्याकडे असावे अशी आग्रही मागणी केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला दावा सोडलेला नाही. यावेळी आम्ही जिल्हा परिषदेत महायुती म्हणून काम करत आहोत. सभापतीपदाबाबत महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही. त्यामुळे मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष याबाबतचा निर्णय जाहीर होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे.

raigad zilla parishad
Raigad ZP : रायगड ZPबाबत मोठी घडामोड; सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार, बैठकीला तटकरे, सामंतांची हजेरी

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषदेत वाद कशामुळे आहे?
समिती सभापती पदांच्या वाटपावरून महायुतीतील पक्षांमध्ये वाद आहे

2. कोणते खाते सर्वाधिक चर्चेत आहे?
अर्थ आणि बांधकाम हे महत्वाचे खाते चर्चेत आहे

3. कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत?
वैकुंठ पाटील, चंद्रकांत कळंबे आणि मधुकर पाटील यांची नावे चर्चेत आहेत

4. निर्णय कधी होणार आहे?
आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे

5. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होईल?
स्थानिक राजकारणातील समीकरणांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com