Hospital Assault Case : कायद्याचा शिंदेंच्या नगरसेवकाला दणका! रमेश म्हात्रेचा पाय आणखी खोलात, कोर्टाने जामीन रद्द करत दिला महत्त्वाचा निर्णय

Ramesh Mhatre Bail Cancelled in Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला कोर्टाने मोठा धक्का दिला असून त्याचा जामीन न्यायालयाने रद्द केला आहे.
Ramesh Mhatre
Ramesh Mhatresarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane Crime News : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक रमेश म्हात्रेंना कल्याण न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. न्यायालयाने म्हात्रेसह तिघांचा जामीन रद्द केला आहे. यामुळे या प्रकरणात म्हात्रेचा पाय आणखी खोलात गेला न्यायालयाने आदेश देताच म्हात्रेची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात (ता.२८ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करत तीन दिवसात शरण येण्याचे आदेश दिले होते. ज्यानंतर आज रमेश म्हात्रे आणि त्याचे 3 साथीदार कल्याण न्यायालयामध्ये हजर झाले होते.

डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरसह तेथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणात म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान म्हात्रेसह या चौघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी जामीन मंजूर केला होता.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला सशर्त जामीन रद्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच राज्य सरकारकडे देखील अर्जाविषयी विचारणा केली होती. यावर आज (रविवारी) विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांचा खंडपीठाने जामीन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता म्हात्रेंसह तिघांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

Ramesh Mhatre
Ramesh Mhatre news : शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका; जामीन रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीतील शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात 6 जुलै 2026 रोजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर व महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. तर या मारहाणीचे कारण नवजात बालकांसाठी असणारे बेड ठरले होते. रुग्णालयाने ते बेड उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. ज्यानंतर वाद वाढत गेल्यानंतर डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांवर म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला होता.

या मारहाणीनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. विविध ठिकाणी डॉक्टर रस्त्यावर उतरले होते. तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. तर राज्यातील डॉक्टर व कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. ज्यानंतर 8 जुलै रोजी म्हात्रेला पोलिसांनी अटक केली. मात्र स्थानिक न्यायालयाने 14 जुलै रोजी त्याला जामीन दिला. यावरून देखील राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.

दरम्यान या घटनेची स्वतःहून दखल 18 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आणि स्थानिक न्यायालयाच्या जामीन आदेशाला स्थगिती दिली. तसेच म्हात्रेला त्वरित शरण येण्याचे निर्देश दिले. या आदेशानंतर 19 जुलै रोजी म्हात्रे पोलिसांना शरण गेला. आणि मुंबई उच्च न्यायालयाने म्हात्रेला 7 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला. याच निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. येथे झालेल्या (ता.२) सुनीवणीनंतर खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश फेटाळला. तसेच, रमेश म्हात्रेला तीन दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.

Ramesh Mhatre
Ramesh Mhatre: "...जामिनाच्याही लायक नाहीत"; डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टानं झाप झाप झापलं!

या आदेशाची डेडलाईन सोमवारी (ता.५) संपणार होती. त्याआधी म्हात्रेसह तिघे रविवारी कल्याण न्यायालयात शरण गेले. यावेळी न्यायाधीश संतोष आगे यांनी म्हात्रेसह तिघांचा जामीन रद्द केल्याचे आदेश दिले आहेत. तसेच या सर्वांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आदेशानंतर म्हात्रेसह तिघांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com