

Kokan Politics : मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा आता थांबल्या असतानाच आता शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत जाणार अशा चर्चा रंगली आहे. तसेच शरद पवार एनडीएमध्ये गेल्यास एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मोठे भाष्य केलं आहे. त्यांनी, शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते असून त्यांच्या येण्याने एनडीए आणखी मजबूत होईल, असे वक्तव्य केले आहे. केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाईल असे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी देखील मंगळवारी (ता.१४) रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १० पैकी ९ आमदार भाजपप्रणित एनडीए सोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर हे आमदार मतदार संघातील विकास कामांच्या निधीवरून हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच आता दीपक केसरकर यांनी, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी अनेकदा महाराष्ट्राचे नेतृत्व केलं आहे. तसेच ते राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व केलेलं महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. यामुळे शरद पवार यांच्या येण्याने एनडीए आणखी मजबूत होईल, असे वक्तव्य केलं आहे.
तसेच केसरकर यांनी, शरद पवारांचे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी उत्तम संबंध आहेत. पवार यांचे सर्वांशीच राजकीय संबंध चांगले आहेत. यामुळे त्यांनी एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या मार्गदर्शनाचा आघाडीला मोठा फायदा होईल असा विश्वास केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.