

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात दुरावा कायम आहे.
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दोन्ही गटातील नेत्यांची ओझरती भेट झाली.
राजकीय मतभेद असूनही उद्धव ठाकरेंबद्दल आदर व्यक्त झाल्याचे दिसून आले.
Shivsena Political News: राज्यातील शिवसेना पक्षात उभी फूट पडली असून 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्तेत गेले आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह त्यांचा गट सध्या विरोधी असणाऱ्या महाविकास आघाडीत सक्रीय आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद बंद झाला असतानाच रोहयोमंत्री भरत गोगावले यांचा एक व्हीडिओ समोर येत आहे. ज्यात ते उद्धव ठाकरेंबद्दल आपला आदर व्यक्त करत आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून गोगावले नेमकं काय म्हणत आहेत याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. तर हा क्षण आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसिप्शन सोहळ्यातील आहे.
राज्यातील शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात संवाद पूर्ण बंद झाला आहे. तर राज्याच्या राजकारणात दोन शिवसेना सक्रीय झाल्या असून दोन्ही शिवसेना एक मेकांवर कुरघोडी करताना दिसत असतात. दोन्ही शिवसेनेतील नेत्यांमध्येही अबोला प्रकर्षणाने जाणवतो.
पण या अबोल्यातही उद्धव ठाकरेंबद्दल आजही आदर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये आहे. याचा प्रत्यक्ष या आधी दीपक केसरक यांच्या माध्यमातून आला असून आता शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या एका कृतीमुळे देखील आता पुन्हा आला आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये पार पडला. ज्यानंतर मुंबईत लग्नसोहळ्याचे रिसेप्शन आयोजीत करण्यात आले होते. या रिसेप्शनसाठी राजकीय पक्षातील दिग्गज नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आणि पक्षातील काही नेते व आमदारांसह हजेरी लावली. त्यांनी नव दाम्पत्यास आशीर्वाद दिले.
यावेळी तेथे मंत्री गोगावले ही तेथे होते. तेथेच त्यांची ठाकरेंबरोबर ओझरती भेट झाली. नवरा-नवरीला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर गर्दी झाली होती. गोगावले नवदाम्पत्यास शुभेच्छा देत असतानाच ठाकरेंची व्यासपीठावर एन्ट्री झाली. यावेळी गोगावले यांनी उद्धव ठाकरेंना पुढे येण्याची विनंती केली.
त्यांनी, 'साहेब, इकडे या...!' अशी हाक दिली. मात्र ठाकरेंनी नको इथंच बराय असे म्हणत स्टेजवरील गर्दी कमी होण्याची वाट पाहिली आणि नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. पण गोगावलेंनी ठाकरेंना दिलेल्या आदराचा हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला अन् याची आता राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या प्रसंगावर गोगावले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून ठाकरे माझ्या मागे उभे असल्याने त्यांना पुढे बोलावले. त्यांना सोबत या अशी विनंती केली. पण त्यांनी, त्यावर नको, इथेच बरा आहे, असे म्हणत प्रतिक्रिया दिल्याची माहिती गोगावलेंनी दिली.
1. शिवसेनेत फूट कशी पडली?
40 पेक्षा जास्त आमदारांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
2. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात संवाद आहे का?
नाही, फूट पडल्यानंतर दोघांमधील संवाद जवळपास बंद आहे.
3. ही भेट कुठे झाली?
आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ही भेट झाली.
4. कोणत्या आमदाराची भेट चर्चेत आहे?
शिवसेना आमदार भरत गोगावले यांची उद्धव ठाकरेंसोबतची भेट चर्चेत आहे.
5. या भेटीचा राजकारणावर काय परिणाम होईल?
सध्या तरी हा फक्त औपचारिक आणि ओझरता संवाद असून राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.