ZP Politics : तळकोकणात भाजपचा मास्टरस्ट्रोक! दिग्गजांना ‘धक्का’, चर्चेतले चेहरे बाहेर; नवीन नेतृत्वाची एंट्री

sindhudurg zilla parishad election : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत बांदा आणि पावशी मतदारसंघाला संधी देण्यात आली असून अध्यक्षपदी कामत तर उपाध्यक्षपदी साईल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ZP Adhyaksha and panchayat samiti sabhapati election
ZP Adhyaksha and panchayat samiti sabhapati electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी तुकाराम साईल यांची बिनविरोध निवड झाली.

  2. भाजपने ‘धक्कातंत्र’ वापरून दिग्गज नेत्यांना डावलत नवीन नेतृत्वाला संधी दिली.

  3. तब्बल ३ वर्षे ३६० दिवसांनंतर जिल्हा परिषदेत पुन्हा लोकनियुक्त सत्तेची स्थापना झाली.

sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपच्या वरिष्ठांनी ‘धक्कातंत्राचा’ वापर करत चर्चेत असलेल्या सर्व दिग्गज सदस्यांना डावलून भाजपच्या बांदा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य प्रमोद कामत यांना अध्यक्षपदाची, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे पावशी मतदारसंघाचे सदस्य तुकाराम ऊर्फ दादा साईल यांना संधी दिली. या दोन्ही उमेदवारांविरोधात एकही अर्ज आला नसल्याने, ही निवड बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यामुळे तब्बल ३ वर्षे ३६० दिवसांनंतर जिल्हा परिषदेत पुन्हा लोकनियुक्त राजवट सुरू झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील लोकनियुक्त प्रशासनाची मुदत २० मार्च २०२२ ला संपली होती. २१ मार्च २०२२ पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट लागू होती. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणीची प्रक्रिया झाली. या निकालात भाजपचे २७, एका पुरस्कृत सदस्यासह शिंदे शिवसेनेचे १४, ठाकरे शिवसेनेचे ३ आणि ६ अपक्ष सदस्य निवडून आले होते. त्यामुळे महायुतीची सत्ता आणि बिनविरोध निवड होणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशानुसार आज अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. दुपारी १२ वाजलेच्या सुमारास भाजप आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित सदस्य दाखल झाले. त्यांच्यासोबत कामत आणि साईल उपस्थित होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते यांसह महायुतीचे सर्व सदस्य आणि तालुका सभापती उपस्थित होते.

ZP Adhyaksha and panchayat samiti sabhapati election
ZP politics : अखेर तटकरेंनी करून दाखवलंच, गोगावलेंना बाहेर बसवत जल्लोषाची तयारी; शिंदेंचे प्रयत्न व्यर्थ

कामत यांच्या अर्जावर प्रमोद रावराणे, तर साईल यांच्या अर्जावर दीपलक्ष्मी पडते यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा झाली. पीठासन अधिकारी साठे यांनी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

अध्यक्षपदासाठी भाजपकडे अनेक मातब्बर सदस्य शर्यतीत होते; मात्र सामाजिक बांधिलकी जपणारे आणि अत्यंत विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले बांदा मतदारसंघाचे सदस्य कामत यांनी कठीण काळातही खासदार नारायण राणे यांची साथ सोडली नव्हती. त्यांच्या या निष्ठेची दखल घेत राणे यांनी स्वतः कामत यांचे नाव निश्चित केले.

माझ्या मतदारसंघातील मतदार आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे मी बिनविरोध निवडून आलो. आता खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम करेन. जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील.

- प्रमोद कामत, नवनियुक्त अध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात नेहमीच आदर्श राहिली आहे. हा लौकिक कायम राखण्यासाठी आणि देशाला दिशा देणारी जिल्हा परिषद बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. सरपंच म्हणून १० वर्षे काम केल्याचा माझा अनुभव उपाध्यक्ष म्हणून काम करताना नक्कीच उपयोगी ठरेल.

- तुकाराम ऊर्फ दादा साईल, नवनियुक्त उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

ZP Adhyaksha and panchayat samiti sabhapati election
ZP President Election : झेडपी अध्यक्ष निवडीबाबत मोठी अपडेट: उद्यापासून सत्ता स्थापनेला येणार वेग? प्रशासकीय पातळीवर वेगवान घडामोडी

FAQs :

1. सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदी कोण निवडून आले?
प्रमोद कामत यांची अध्यक्षपदी निवड झाली.

2. उपाध्यक्षपदी कोण निवडले गेले?
तुकाराम उर्फ दादा साईल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

3. ही निवडणूक कशी झाली?
कोणताही विरोधी अर्ज न आल्यामुळे निवड बिनविरोध झाली.

4. भाजपने कोणती रणनीती वापरली?
दिग्गजांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची ‘धक्कातंत्र’ रणनीती वापरली.

5. या घटनेचे महत्त्व काय आहे?
जिल्हा परिषदेत जवळपास ४ वर्षांनंतर पुन्हा लोकनियुक्त सत्तेची स्थापना झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com