Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत धक्कादायक प्रकार: शिक्षकाच्या चौकशीचा जाब विचारताच अधिकाऱ्याचा टोकाचा इशारा

Sindhudurg's Vaibhavwadi copy scandal : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कॉपी प्रकरणावरून धक्कादायक प्रकार समोर आला असून शिक्षकाच्या चौकशीवरून जाब विचारताच अधिकाऱ्याने आत्महत्येचा इशारा दिला. तसेच सभेतून सभागृहातून निघून गेला. यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला होता.
SSC Copy Case
SSC Copy CaseSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg news : दहावीच्या परीक्षेत शिक्षकाने विद्यार्थ्याचा पेपर लिहिल्याच्या प्रकरणात अडकलेल्या शिक्षकाच्या चौकशीचा जाब शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला विचारल्याने संतप्त झालेल्या संबंधित अधिकाऱ्याने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांना सभेचे कामकाज सुरू असतानाच ‘मी आत्महत्या करणार’ असा मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार आज जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत समोर आला. संबंधित अधिकारी सभागृहातून निघून गेल्याने सदस्य आक्रमक झाले. ‘अशा अधिकाऱ्याची आम्हाला गरज नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, ’ अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली.

जिल्हा परिषद अध्यक्ष कामत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, विषय समिती सभापती संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, रुहिता तांबे, अनुराधा नारकर, सदस्य तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

भुईबावडा केंद्रात दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याचा पेपर शिक्षकाने लिहून दिल्याचे प्रकरण समोर आले होते. त्या शिक्षकाच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. या प्रकरणी सदस्य प्रमोद रावराणे सातत्याने आवाज उठवत असून, त्यांनी मागील शिक्षण समितीच्या सभेत शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला होता. याचाच राग आल्याने संबंधित अधिकाऱ्याने सभा सुरू असतानाच रावराणे यांना आत्महत्या करण्याची धमकी देणारा मेसेज पाठविल्याचा आरोप सभेत करण्यात आला.

SSC Copy Case
SSC Copy Case : दहावीच्या कॉपी प्रकरणात नवा ट्विस्ट; न्यायालयाने झटका देताच 22 दिवसांपासून फरार असणारा मुख्याध्यापक सरेंडर; आता सगळं येणार समोर...

सदस्या सुमेधा पाताडे यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत सदस्यांना धमकी देण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल जात असेल, तर अशा अधिकाऱ्याची गरज काय, असा प्रश्‍न केला. संबंधित अधिकाऱ्याला जिल्ह्यात काम करायचे नसेल तर त्याला कार्यमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली. या चर्चेत बहुतांश सदस्यांनी सहभाग घेतला. प्रमोद रावराणे यांनी ‘माझ्याजवळ सर्व माहिती आहे.

SSC Copy Case
SSC Copy Case : दहावीच्या परीक्षेत ‘कोकण पॅटर्न’चा धक्कादायक प्रकार! एका विद्यार्थ्याच्या सातही पेपरच्या पुरवण्या दुसऱ्यानेच लिहिल्या

मात्र बोलायलाही भीती वाटते, ’ असे सांगत या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. सदस्य संदेश सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com