Mahesh Aher rape case arrested : अशोक खरातचा ‘अंधभक्त’ सहायक आयुक्ताला बेड्या; बलात्कार प्रकरणात 15 दिवसांपासून होता पसार

Absconding Thane Municipal Corporation Assistant Commissioner Mahesh Aher, allegedly linked Nashik Ashok Kharat, was arrested police from Kolhapur rape case investigation : बलात्काराच्या गुन्ह्यात पसार असलेला ठाणे महापालिकेचा सहायक आयुक्त महेश आहेर याला कोल्हापूर इथून पोलिसांनी अटक केली.
Assistant Commissioner Mahesh Aher
Assistant Commissioner Mahesh AherSarkarnama
Published on
Updated on

Mahesh Aher Kolhapur arrest : 2020 ते 2023 या कालावधीत शारीरिक छळ, मानसिक त्रास आणि त्यानंतर शीतपेयात गुंगीचे द्रव्य टाकून केलेलं शारीरिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पसार असलेला ठाणे महापालिकेचा सहायक आयुक्त महेश आहेर याला पोलिसांनी कोल्हापूर इथून अटक केली.

महेश आहेर याने, पीडितेला नाशिक इथल्या अशोक खरात याच्या दरबारात देखील घेऊन गेला होता. त्यामुळे हे प्रकरणामागे खूप काही गंभीर दडल्याची चर्चा आहे.

पीडितेने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हा (Crime) दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून सहायक आयुक्त महेश आहेर हा पसार होता. 15 दिवसांपासून पसार असलेल्या महेश आहेर याच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखा पोलिसांची पथके रवाना होती. पण तो सापडत नव्हता.

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पसार असलेला ठाणे महापालिकेचा माजी सहायक आयुक्त महेश आहेर कोल्हापूर पोलिसांनी (Police) गुरूवारी पहाटे नरंदे (ता. हातकणंगले) इथून ताब्यात घेतलं. नरंदे इथल्या एका हॉटेलमध्ये तो लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तिथं छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं.

Assistant Commissioner Mahesh Aher
Ashok Kharat ED case : 'ED'चा ससेमिरा वाढला; अशोक खरातच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज

महेश आहेर याला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचेही नाव समोर आलं आहे. पीडितेला नाशिक इथं नेऊन अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Assistant Commissioner Mahesh Aher
Ashok Kharat Case : शिर्डी पोलिस 'ॲक्शन मोड'वर! बेकायदेशीर सावकारकी प्रकरणी खरातच्या अडचणीत वाढ; पोलिसांचा ताब्यासाठी न्यायालयात अर्ज

15 दिवसांपासून फरार

गुन्हा दाखल झाल्यापासून महेश आहेर गायब होता. तपासादरम्यान ठाणे पोलिसांनी त्याच्या घरी आणि इतर संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले होते, मात्र तो सापडत नव्हता. दरम्यानच्या काळात त्याने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जही दाखल केला होता. परंतु नंतर त्याने तो अर्ज मागे घेतला.

नेमके प्रकरण काय?

महेश आहेर याने सहाय्यक आयुक्त पदावर असताना आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन आपल्यावर जबरदस्तीने अत्याचार केला, असा आरोप पीडितेनं केलेला आहे. एवढंच नव्हे, तर आहेर याने आपल्याला वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये देखील नेलं होतं, असा गंभीर आरोप पीडितेनं केलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com