No Confidence Motion : शिंदेंच्या ठाण्यात युतीला सुरुंग; भाजपच्या सभापतींसह शिवसेनेच्या उपसभापतींनाही हटवले!

Political turmoil Thane Shahapur APMC 15 directors back no-confidence motion against BJP chairman and 14 against Eknath Shinde Sena vice-chairman. Maruti Dhirde role draws attention : ठाणे जिल्ह्यातील शहापूर बाजार समितीत 15 संचालकांचा सभापतींविरोधात, तर 14 संचालकांचा उपसभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल; शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धीर्डे यांचे नाव चर्चेत.
Thane Shahapur APMC
Thane Shahapur APMCSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane Shahapur APMC : महायुतीमधील शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे जिल्ह्यात महायुतीच्या सत्तेला धक्का बसला आहे. शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना युतीच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. विशेष म्हणजे, या राजकीय उलथापालथीचे नेतृत्व एकनाथ शिंदे शिवसेनेचाच नेता करत असल्याची चर्चा आहे.

यातून बाजार समितीतील सभापती-उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. बाजार समितीच्या 18 पैकी 15 संचालकांच्या उपस्थितीमध्ये, भाजपच्या सभापतींविरोधात सर्व 15, तर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उपसभापतींविरोधात 14 संचालकांनी मतदान केले. एका संचालकाने उपसभापतींविरोधात मतदान केले नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धीर्डे यांच्याकडे बाजार समितीतील सत्तेचा रिमोट असल्याची चर्चा आहे.

भाजपकडे (BJP) सभापती नंदकुमार डोहळे, तर एकनाथ शिंदे शिवसेनेकडे उपसभापतीपद शरद वेखंडे यांच्याकडे होते. या दोघांविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने, सत्ताधारी युतीच्या बाजार समितीतील सत्तासमीकरणांना आगामी काळात मोठा धक्का बसला आहे. विशेषतः भाजपच्या स्थानिक नेतृत्वाविषयी असलेली नाराजी या अविश्वास ठरावामागे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

अविश्वास ठरावावेळी 15 संचालक उपस्थित होते. यात भाजपचे सभापती नंदकुमार डोहळे, शिवसेनेचे (Shivsena) उपसभापती शरद वेखंडे आणि आणखी एक संचालक असे तिघे या बैठकीला गैरहजर होते. या बैठकीत शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Thane Shahapur APMC
Sujay Vikhe disqualification petition : सुजय विखेंच्या बिनविरोध निवडीवर घोगरेंचा न्यायालयीन बॉम्ब; थकबाकीदार ठरवून अपात्र करण्याची मागणी!

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना युतीकडे होती. बाजार समितीच्या 18 जागांपैकी भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रत्येकी चार संचालक निवडून आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाच, काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्ष, जिजाऊ संघटनेचा प्रत्येकी एक आणि एक अपक्ष संचालक निवडून आले आहेत.

Thane Shahapur APMC
Balasaheb Thorat Nilesh Lanke meeting : सुजय विखे अध्यक्ष होताच थोरात लंकेंच्या 'होमग्राऊंडवर'! जिल्हा बँकेतील दोस्ती, राजकारणात कुस्ती?

या राजकीय उलथापालथीत एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धीर्डे यांचे नाव चर्चेत आले आहे. माहितीनुसार, सध्या नऊ संचालक एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेतृत्व मानणारे, तर तीन संचालक भाजपचे नेतृत्व मानणारे असल्याचे सांगितली जात आहे. अविश्वास ठरावामागील नेमकी कारणे आणि संबंधित संचालकांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. विशेष म्हणजे, भाजपच्या सभापतींप्रमाणेच शिवसेनेच्या उपसभापतींविरोधातही मोठ्या संख्येने मतदान झाले आहे. त्यामुळे हा अविश्वास ठराव केवळ भाजपविरोधातील नाराजीपुरता मर्यादित नसून, बाजार समितीतील विद्यमान नेतृत्व बदलण्याच्या व्यापक हालचालींचा भाग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नव्याने होणाऱ्या निवडीकडे लक्ष

अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील दहा दिवसांत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. बाजार समितीच्या 18 संचालकांमधूनच या दोन्ही पदांसाठी नवीन पदाधिकारी निवडले जाणार आहेत. आता या निवडणुकीत भाजप आपले सभापतीपद कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार की एकनाथ शिंदे शिवसेना नेतृत्वासाठी पुढाकार घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.