Shivsena Corporators : पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांचा नगरसेवकांना विसर? कार्यक्रमांना दांडी; सामंतांच्या नाराजीनंतर शहरप्रमुखांचा सज्जड दम, 'पक्षापेक्षा'

Uday Samant Expresses Anger Over Shivsena Corporators Low Attendance : रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेकडून पालकमंत्र्यांच्या सर्व विकासकामांच्या कार्यक्रमांना नगरसेवकांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासकामांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी चांगलेच सुनावले. विकासकामांच्या कार्यक्रमांना नगरसेवकांची अत्यल्प उपस्थिती असल्याने पालकमंत्री सामंत यांनी थेट शहरप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बंदरकर यांनी तातडीने महापालिकेत सर्व नगरसेवकांची बैठक घेत त्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. त्यामुळे यापुढे होणाऱ्या सर्व विकासकामांच्या कार्यक्रमांना नगरसेवकांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे त्यांनी बजावले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यांची आणि कार्यक्रमांची माहिती शहरप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांनाही दिली जाते. त्यानुसार शहरप्रमुखांकडून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून कार्यक्रमांची माहिती दिली जाते. मात्र, गेल्या आठवड्यात पेठकिल्ला येथे झालेल्या विकासकामांच्या कार्यक्रमाला नगरसेवकांची उपस्थिती अत्यल्प होती. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाबाबत शहरप्रमुखांकडून नगरसेवकांना कोणताही संदेश पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे कार्यक्रमाला नगरसेवकांची उपस्थिती कमी राहिल्याचे समोर आले.

या प्रकारामुळे पालकमंत्री सामंत यांनी शहरप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी आपण शहराबाहेर असल्याचे सांगत बिपिन बंदरकर यांनी आपली बाजू मांडली. मात्र, यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी त्यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक घेतली.

Uday Samant
Uday Samant : ठाणे पोलीस आयुक्तांनंतर उदय सामंत यांचाही मोबाईल हॅक; फेसबुक आणि ट्विटर अकाउंटलाही फटका, पैसे दिल्याचा खुलासा

पालकमंत्री उदय सामंत विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देतात. केवळ निधी देऊन ते थांबत नाहीत, तर कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावाही करतात. त्यामुळे विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण तसेच भविष्यातील सर्व कार्यक्रमांना नगरसेवकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे बंदरकर यांनी स्पष्ट केले.

Uday Samant
Uday Samant : शिवसेना नेत्याचा जयकुमार गोरेंना इशारा : ‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’

सामंतांच्या प्रयत्नांचा नगरसेवकांना विसर?

पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नगरसेवकांना निवडणुकीत उमेदवारी मिळाली. त्यांना निवडून आणण्यासाठीही सामंत यांनी मोठी मेहनत घेतली. नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली. असे असतानाही विकासकामांच्या कार्यक्रमांना काही नगरसेवकांकडून सातत्याने दांडी मारली जात असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर सामंत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शहरप्रमुखांनी नगरसेवकांची बैठक घेत उपस्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे आता आगामी विकासकामांच्या कार्यक्रमांना नगरसेवक किती गांभीर्याने उपस्थित राहतात, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.