

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील शिवसेना भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून भाजपच्या युती तोडण्याच्या घोषणेनंतर हा वाद आता पोलिसांत गेला आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने महापौर अश्विनी निकम यांनी दिलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली आहे. तर हा निर्णय भाजपच्या आक्षेपानंतर आल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
अशातच आता महापौर अश्विनी निकम यांना देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता असून त्यांचे पती कमलेश निकम यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात वक्तव्य करणे भोवण्याची शक्यता आहे. एकीकडे कमलेश निकम यांना ‘भेटेल तिथे फटके देणार’, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मंचेकर टोळीशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. ज्यानंतर भाजप पदाधिकारी कपिल अडसूळ आणि मनीष हिंगोरानी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करत निकम यांना ‘भेटेल तिथे फटके देणार’, अशी धमकी दिली आहे. यावरून सध्या उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप आमने-सामने आली आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात चुकीचे वक्तव्य केल्यावरून संतापलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वाधारिया यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतलीय. त्यांनी कमलेश निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी निकम यांच्यावर कारवाई केली नाही तर हा मुद्दा येत्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असा इशारा भाजप आमदार कुमार आयलानी यांनी दिला आहे.
दुसरीकडे, निकम यांनी भाजपचे पदाधिकारी आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ, मनीष हिंगोराणी आणि अवि पंजाबी यांची नावे घेत त्यांना अटक करावी अशी मागणी देखील केली आहे. तर रामचंदानी यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसानी ताब्यात घ्यावे, असेही आवाहन पोलीस उपायुक्तांना केले आहे.
उल्हासनगरमध्ये सुरू झालेला शिवसेना आणि भाजपामधील राजकीय संघर्ष आता आरोप-प्रत्यारोपांपलीकडे जाऊन उच्च न्यायालयासह पोलिसांत गेला आहे. यामुळे या प्रकरणात आता दोन्ही पक्षांचे प्रमुखांसह न्यायालय आणि पोलिस कोणती भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.