OBC Politics : लक्ष्मण हाकेंनी टाकला मोठा डाव! ओबीसींची मोर्चेबांधणी करीत नव्या पक्षाची घोषणा; प्रस्थापितांचा करणार करेक्ट कार्यक्रम ?

OBC Janata Party News : येत्या काळात ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभेची निवडणूक ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठा डाव टाकला आहे. येत्या काळात ओबीसींची मोर्चेबांधणी करण्यासाठी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यासाठी नव्या पक्षाची घोषणा करीत त्यांनी प्रस्थापितांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारी दर्शवली आहे. 'ओबीसी जनता पार्टी' हा नवा राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

यावेळी लक्ष्मण हाके यांनी येत्या काळात ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभेची निवडणूक ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी भाजपचा डीएनए हा आता ओबीसी राहिलेला नाही आता कारखानदारांचा झाला असल्याची टीका त्यांनी केली.

Laxman Hake
Maharashtra News Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

भाजपने काही दिवसापूर्वी फोडाफोडी करीत शिवसेनेचे सहा खासदार फोडले आहेत. आता ही फोडाफोडी करण्याची भाजपला गरज नव्हती, मात्र त्यांनी पक्ष फोडला. आता काही गरज नसताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची तयारी सुरु केली आहे. पक्ष फोडण्याची काय गरज होती ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Laxman Hake
Maratha Bhavan : धनंजय मुंडेंची अडचण वाढणार? 'मराठा भवन'च्या जागेवरून वाद पेटल्यानंतर विरोधक आक्रमक; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीमुळे...

भाजपला सत्तेत जाण्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज होती. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची काय गरज होती. एकदा तुम्ही ममता बॅनर्जीचा पक्ष फोडता, उरलासुरला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडता असे हाके म्हणाले. उद्धव ठाकरेंचे खासदार जे फुटले ते भाजपविरोधात निवडून आले आणि तेच परत शिंदेकडे गेले आहेत. भाजपचा डीएनए आता प्रसाद लाड आहे, प्रविण दरेकर आहे, अशी टीका हाके यांनी केली.

Laxman Hake
Maratha Bhavan : धनंजय मुंडेंची अडचण वाढणार? 'मराठा भवन'च्या जागेवरून वाद पेटल्यानंतर विरोधक आक्रमक; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीमुळे...

सत्ता येत असतात जात असतात मुख्यमंत्री येत असतात जात असतात. पण मी ज्या प्रवर्गाची भाषा बोलतोय त्याच्या शोषणावर राष्ट्रवादीने काय केले ते मला सांगा. राष्ट्रवादीने कोणता लढा उभारलाय ते मला सांगा असे हाके म्हणाले. कारखाने काढले, उद्योगपतींशी साटलोटं केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एक असल्याचे ते म्हणाले.

Laxman Hake
Maharashtra Politics Live Update : विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठीच काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा - शशिकांत शिंदे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com