MLC Election : सुनेत्रा पवारांचे 'धक्कातंत्र', विधान परिषदेत माजी आमदाराला संधी? पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद वाढवण्यासाठी रणनीती...

Legislative Council Election Sunetra Pawar : विधान परिषद निवडणुकीत अनेकांची नावे चर्चेत आहेत. या चर्चेमध्ये पुण्यातील माजी आमदाराचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले आहे.
Sunetra Paw
Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News: अजित पवारांच्या निधनानंतर विधान परिषदेची पहिलीच निवडणूक होत आहे. 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अवघी एक जागा येत आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात मोठी चुरस आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणाला संधी देणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पक्षात अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र, कधीकाळी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा होता. मात्र, महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले नाही. पक्षाची ताकद या शहरांमध्ये कमी होत असताना येथील नेत्याला विधान परिषदेत संधी देत पक्षाची ताकद वाढवण्याची रणनीती आखली जाण्याची चर्चा आहे.

माजी आमदार सुनील टिंगरे यांचे नाव पुण्यातून विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असले तरी त्यांच्या परिवाराची जवळीक ही भाजपसोबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याच मतदारसंघात सुनील टिंगरे यांना ताकद देण्याची चर्चा आहे.

Sunetra Paw
MLC Election : महाराष्ट्राला तब्बल 27 नवीन आमदार मिळणार : आयोगाकडून चाचपणी सुरु, 3 महिन्यात होणार प्रक्रिया?

पिंपरी-चिंचवडमधून कोण?

पिंपरी-चिंचवड या शहराने राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच साथ दिली होती. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला ढासळला आहे. महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतः लक्ष घातले होते. भाजपची येथे वाढणारी ताकद पाहता विधान परिषदेसाठी येथील नेत्यांच्या नावाची देखील विचार होऊ शकतो. त्यामध्ये योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, गव्हाणे महापालिका निवडणुकीत फारसे सक्रीय दिसले नाहीत.

तटकरे गट सक्रीय?

पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा गट निर्माण होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्या गटातील नेत्यांची नावे देखील उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. अशा स्थितीत अजित पवारांचा एकनिष्ठ शिलेदार म्हणून अमोल मिटकीर यांचे नाव देखील पुन्हा उमेदवारीसाठी चर्चेत येत आहे. त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात पक्षाची बाजू नेटाने मांडली होती.

Sunetra Paw
Legislative Council Election : देवेंद्र फडणवीसांचे धक्कातंत्र, मोहिते पाटील, केचेंचा पत्ता कट? विधान परिषदसाठी 'या' नेत्यांची नावे चर्चेत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com