Maharashtra Budget 2026: एकनाथ शिंदेंच्या गावात निसर्गोपचार केंद्र, अजितदादांच्या नावे पुरस्कार; फडणवीसांनी केल्या या मोठ्या घोषणा

Devendra Fadnavis Budget 2026 Live Update: संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे.
Devendra Fadnavis Budget 2026 live update
Devendra Fadnavis Budget 2026 live updateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget 2026 Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला, यात शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, गोपीनाथ मुंडे अपघात योजना आदी योजनांसह विविध योजनांची फडणवीसांनी घोषणा केली.

  • 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

  • नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, असेदेखील फडणवीसांनी जाहीर केले.

  • वासोटा किल्ल्यावर (जि.सातारा) पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार येणार आहे.

  • नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.

Devendra Fadnavis Budget 2026 live update
Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प! अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार; फडणवीसांकडून घोषणा
  • संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे.

  • बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील.

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे.

  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.

  • ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली. २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहे.

  • २३ हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे.

  • अजित दादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल.

Devendra Fadnavis Budget 2026 live update
Devendra Fadnavis News: फडणवीस, गडकरींसोबतचा अनुभव पुण्यात काम करताना उपयोगी ठरेल!
  • आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे.

  • राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील.

  • सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.

  • प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार, बांबू विकास प्रकल्प वाढवणार, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे.

  • मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास आले आहे.

Devendra Fadnavis Budget 2026 live update
Maharashtra Police: जिथं भांडी घासली तिथंच खाकी वर्दीत सत्कार झाला! वेटर ते PSI: संग्राम मळकर यांची संघर्षगाथा तुम्हाला माहीत आहे का?
  • महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र सुरु केले जाईल

  • मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे

  • महाराष्ट्र डिजिटल तंत्रज्ञान अभियान राबविले जाईल

  • आयुष्यमान योजने १ हजार ३५६ वरून २ हजार ३९९ पर्यंत आजारात वाढ केली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com