Farmer Decision : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 5000 रुपये, फडणवीस सरकारचा दिलासादायक निर्णय

Maharashtra farmers 5000 before Diwali : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5000 रुपयांची मदत मिळणार, फडणवीस सरकारचा निर्णय, पात्रता आणि आर्थिक मदतीबाबतची ताजी माहिती जाणून घ्या.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी दिलासा देणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5000 रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सणासुदीच्या काळात आर्थिक मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण साजरा करताना शेतकऱ्यांना पैशांची अडचण जाणवू शकते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
NCP MLA Death Threat : विरोध केल्यास ‘खलास करू’, राष्ट्रवादीच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; एका पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, दुष्काळाशी संबंधित मदतीची संपूर्ण कार्यप्रणाली दिवाळीपूर्वी पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आम्हाला कल्पना आहे दिवाळी येते आहे, दिवाळी अडचणीची आहे. दुष्काळाची कार्यप्रणाली दिवाळीआधी पूर्ण होणं कठीण आहे. दिवाळीआधी सगळी कामं होऊ शकत नाही. मात्र एकूणच सगळ्या गोष्टी विचारात घेता, आज मंत्रिमंडळाशी चर्चा केली आणि दिवाळी आधी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीआधी 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील."

Devendra Fadnavis
CJP Leaders Arrest News : अखेर पोलिसांनी सौरव दास, रांका यांना घेरलंच; अजिंक्य शिंदेंची सुटका, राहुल गांधी संतापले

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने यापूर्वीच दुष्काळाबाबत आगाऊ निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय ऑक्टोबरमध्ये काढण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

सामान्यतः दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण होत असली, तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आधीच पावले उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com