Maharashtra Government : राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर साध्या 'आमदार निवासात' राहण्याची वेळ : मकरंदआबांना 'पुनर्वसनासाठी' शासकीय 'मदतीची' गरज

Maharashtra Government : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील सव्वा वर्षांपासून शासकीय निवासाच्या प्रतीक्षेत आहेत. मंत्र्यांनाच निवास न मिळाल्याने शासनाच्या घर वाटप व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Maharashtra minister Makarand Patil continues to wait for an official government bungalow, highlighting concerns over housing allocation within the state cabinet.
Maharashtra minister Makarand Patil continues to wait for an official government bungalow, highlighting concerns over housing allocation within the state cabinet.sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government : राज्य मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांना अलिशान शासकीय बंगले उपलब्ध करून दिली जातात. पण मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील गेल्या सव्वा वर्षांपासून मंत्र्याच्या अधिकृत निवासस्थानाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यानाच पुनर्वसनासाठी शासकीय मदतीची गरज आहे.

मकरंद पाटील सध्या 'आकाशवाणी आमदार निवासातील १२० क्रमांकाच्या सदनिकेतून आपला प्रशासकीय कारभार पाहत आहेत. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाची जबाबदारी असलेल्या मंत्र्यालाच हक्काच्या निवासासाठी ताटकळत राहावे लागत असल्याने प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंत्र्यांना निवासस्थान आणि कार्यालयवाटपाची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची आहे. तर दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र, मकरंद पाटील यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्यात हे विभाग अपयशी ठरल्याची टीका होत आहे.

Maharashtra minister Makarand Patil continues to wait for an official government bungalow, highlighting concerns over housing allocation within the state cabinet.
Maharashtra Politics Live Update : राहुरीत बिनविरोध नाहीच, सात उमेदवार रिंगणात

पुनर्वसनासाठी शासकीय मदतीची गरज :

मकरंद पाटील यांना 'सुरूची' इमारतीतील सदनिका मंजूर आहे. मात्र ही सदनिका दुरुस्तीच्या फेऱ्यात अडकला आहे. संबंधित कंत्राटदाराचे बिल थकल्याने हे काम रखडल्याची माहिती आहे. याबाबत मंत्री पाटील यांची याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.

यावर बोलताना मुख्य अभियंता (प्रेसिडेन्सी विभाग) प्रज्ञा वाळके यांनी सांगितले, की मंत्री पाटील यांना 'सुरुची' इमारतीतील सदनिका दिली आहे. ती ताब्यात मिळण्यास विलंब झाला असला, तरी दुरुस्तीचे कामानंतर लवकरच या सदनिकेचा ताबा मंत्र्यांकडे दिला जाईल, असेही स्पष्ट केले.

Maharashtra minister Makarand Patil continues to wait for an official government bungalow, highlighting concerns over housing allocation within the state cabinet.
Maharashtra politics : आधी तटकरे अन् आता प्रफुल्ल पटेलांमुळे फुटलं नव्या वादाला तोंड; पोस्टरवरून राष्ट्रवादीत खळबळ; शरद पवारांच्या शिलेदारानं डिवचलं

मकरंद पाटील कोण आहेत?

मकरंद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे चिरंजीव आहेत. सध्या ते सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातून आमदार आहेत. 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग चौथ्यांदा ते निवडून आले आहेत. चौथ्या टर्ममध्ये निवडून आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com