Maharashtra politics : आधी तटकरे अन् आता प्रफुल्ल पटेलांमुळे फुटलं नव्या वादाला तोंड; पोस्टरवरून राष्ट्रवादीत खळबळ; शरद पवारांच्या शिलेदारानं डिवचलं

NCP leaders News : सुनील तटकरे पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमातील पोस्टरवरून वाद ! प्रफुल्ल पटेल यांनीही पोस्टरवर फोटो टाकणे टाळले ?
prafull patel
prafull patel Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आले होता. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे त्यांच्यासह मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात लावलेल्या पोस्टरवरून राष्ट्रवादी अंतर्गत वाद पाहिला मिळाला. कार्यक्रमासाठी लावलेला पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो देखील लावण्यात आला नव्हता.

prafull patel
Sunetra Pawar : अजित पवारांच्या अपघाताचा गुन्हा दाखल होताच सुनील तटकरे विधानभवनात सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

यावरून उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी नाराजी व्यक्त केली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाही. परवा रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात या सर्वांचे फोटो वगळून कार्यक्रम घेण्यात आला ही गोष्ट मनाला पटणारी नाही, असे त्यांनी सांगितले.

prafull patel
Ajit Pawar NCP Controversy : राष्ट्रवादीत नवा ‘देव’ तयार होतोय? अमोल मिटकरींचा भन्नाट टोला

त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमातील फोटो समोर आला आहे. तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा पार पडला. कार्यक्रमावेळी लावलेल्या पोस्टर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मोठा फोटो लावण्यात आला होता. त्यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा छोटा फोटो आणि त्यासोबतच स्थानिक नेत्यांचे फोटो लावले होते. मात्र, या पोस्टरवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कुठेही फोटो लावण्यात आला नव्हता, त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून टीका करण्यात आली आहे.

prafull patel
Sunil Tatkare News : सुनील तटकरेंच्या कार्यक्रमातील बॅनरवरून अजितदादा, सुनेत्रा पवारांचे फोटो गायब; राष्ट्रवादीत राडा, वाद पेटला!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रवक्ते सुनील माने म्हणाले, 'दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत घातपात आहे की अपघात यासाठी आमदार रोहित पवार यांच्यासह आम्ही जंग जंग पछाडत आहोत. याबाबत कर्नाटकमध्ये झिरो देखील रजिस्टर केली. मात्र त्यांच्यासाठी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली ते नेते अजितदादांना विस्मरणात ढकलत आहेत. रायगड आणि गोंदिया या दोन्ही ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात फ्लेक्सवरून अजितदादांचा फोटो गायब करणे खेदजनक असल्याची टीका सुनील माने यांनी केली.

prafull patel
Ajit Pawar NCP Controversy : राष्ट्रवादीत नवा ‘देव’ तयार होतोय? अमोल मिटकरींचा भन्नाट टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com