

Mumbai News: राज्य सरकारकडून गुरुवारी (ता.2 एप्रिल) पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहे.सरकारने काढलेल्या आदेशात एकाचवेळी राज्यातील तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कोल्हापूर,नागपूर, छत्रपती संभाजीनगरला नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड तर आयुक्त मंजू लक्ष्मी यांची अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली मनपाचे आयुक्त सत्यम गांधी यांची बदली झाली असून संजिता मोहापत्रा यांची नवे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे हे छत्रपती संभाजी नगर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.तर रत्नागिरीच्या सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉ. जसस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या प्रशासनातील एकाचवेळी 10 ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.तर भिडे यांच्या जागी 1993 च्या बॅचच्या लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, हिवाळी अधिवेशन अशा विविध कारणांमुळे महाराष्ट्रात मागील 6 महिन्यांपासून सनदी अधिकारी आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे मार्च महिना संपतानाच या बदल्या होणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार चार दिवसांपूर्वी (28 मार्च) काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज (31 मार्च) मुख्यमंत्री कार्यालयापासून मुंबई महापालिका आयुक्तपदापर्यंतच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. 2014 च्या आयएएस बॅचचे अधिकारी व मूळचे कराड येथील असलेल्या अमोल येडगे यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
यापूर्वी त्यांनी नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी,आयटीडीपीचे प्रकल्प संचालक, अमरावती, बीड येथे त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
1. श्री विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे.
2. डॉ.प्रविणकुमार देवरे आयुक्त पशुसंवर्धन पुणे यांची जिल्हाधिकारी बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे.
3. डॉ.किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांची आयुक्त पशुसंवर्धन पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
4. श्री दीपक सिंगला अतिरिक्त आयुक्त पीएमआरडीए पुणे यांची मनरेगा आयुक्त नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
5. डॉ. भारत बस्तेवाड आयुक्त मनरेगा नागपूर यांची लातूरच्या जिल्हाधिकारी येथे बदली करण्यात आली आहे.
6. डॉ.विजय राठोड जॉइंट सीईओ एमआयडीसी मुंबई यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी येथे बदली
7. डॉ. मंगेश गोंदवले एमडी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई यांची जिल्हाधिकारी गोंदिया येथे बदली करण्यात आली आहे.
8. श्री प्राजी नायर जिल्हाधिकारी गोंदिया यांची एएमसी, पुणे कॉर्पोरेशनमध्ये बदली करण्यात आली आहे
9. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे जिल्हाधिकारी लातूर यांची संयुक्त सीईओ एमआयडीसी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
10. श्री जी श्रीकांत, एमसी, छत्रपती संभाजीनाग महानगरपालिका यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
11. श्री अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांची एमसी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे.
12. श्री अंकित, सीईओ झेडपी, छत्रपती संभाजीनगर यांची एएमसी, नागपूर महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे.
13. श्रीमती वसुमना पंत एएमसी, नागपूर महानगरपालिका यांची जिल्हाधिकारी चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.
14. श्री दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांची एमडी एमएस सीड्स कॉर्पोरेशन अकोला येथे बदली करण्यात आली आहे.
15. श्रीमती अंजली शर्मा यांची एमसी, जालाना महानगरपालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
16. श्रीमती मिन्नू सीईओ झेडपी जालना यांची सीईओ झेडपी छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे.
17. श्री कृष्णकांत कंवरिया सहाय्यक.कॉ.शहादा, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जालना येथे बदली करण्यात आली आहे.
18. श्रीमती वर्षा लड्डा एमएस महाराष्ट्र कृषी संशोधन आणि शिक्षण परिषद पुणे यांची एमसी, अमरावती महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे.
19. श्रीमती के. मंजुलक्ष्मी एमसी, कोल्हापूर महानगरपालिका यांची अतिरिक्त आयुक्त पीएमआरडीए पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
20. डॉ. राजेंद्र भारुड प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान (रुसा) मुंबई यांची एमसी कोल्हापूर महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे.
21. श्री सत्यम गांधी एमसी, सांगली मिरज महानगरपालिकेचे सीईओ झेडपी अमरावती यांच्याकडे बदली करण्यात आली आहे
22. श्रीमती संजीता महापात्रा सीईओ झेडपी अमरावती यांची सांगली मिरज महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे.
23. डॉ. जास्मिन, सहाय्यक महाविद्यालय राजापूर, रत्नागिरी यांची सीईओ झेडपी कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे.
24. श्री कार्तिकेयन एस सीईओ झेडपी कोल्हापूर यांची जिल्हाधिकारी सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे.
25. श्री कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांची जिल्हाधिकारी नागपूर येथे बदली करण्यात आली आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.