IAS Transfer : मोठी बातमी! राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत 'सर्जिकल स्ट्राइक'! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाला कुठे संधी?

Three senior IAS officers transferred News : राज्य सरकारकडून गेल्या आठवड्यात (सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी) तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते.
Maharashtra IAS officer transfer
Maharashtra IAS officer transferSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra IAS Transfer : राज्य सरकारने ५ ऑक्टोबर रोजी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. त्यानंतर आता आठवडाभरातच आणखी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डॉ. मंजिरी मनोलकर, शुभम गुप्ता आणि डॉ. भालचंद्र चव्हाण यांना नव्या पदांवर नियुक्त केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, या बदल्यांमुळे राज्यातील विविध प्रशासकीय विभागांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत.

गेल्या आठवड्यातही बदल्या

गेल्या आठवड्यात राज्य सरकारने महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये आयएएस अधिकारी संजय खंदारे यांची वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर आयएएस अधिकारी संजय यादव यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. तसेच आयएएस अधिकारी वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

बदलीचे आदेश जारी

या बदल्यांनंतर राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील फेरबदलांची चर्चा सुरू असतानाच, सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आणखी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, डॉ. मंजिरी मनोलकर, शुभम गुप्ता आणि डॉ. भालचंद्र चव्हाण यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे.

Maharashtra IAS officer transfer
IAS transfer : प्रशासनात अचानक 'सर्जिकल स्ट्राइक'! एकाच रात्रीत 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

IAS डॉ. मंजिरी मधुसूदन मनोलकर

डॉ. मंजिरी मधुसूदन मनोलकर या पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार, त्यांची पुणे येथील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS शुभम गुप्ता

शुभम गुप्ता हे पुणे येथील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची मुंबई येथील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS शुभम गुप्ता

शुभम गुप्ता हे पुणे येथील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची मुंबई येथील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण

डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण हे मुंबई येथील महसूल व वन विभागात आपत्ती व्यवस्थापन संचालक म्हणून कार्यरत होते. शासनाच्या नव्या बदली आदेशानुसार, त्यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra IAS officer transfer
IAS Transfer : राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे संधी? संजय खंदारे वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी

दरम्यान, या बदल्यांमुळे महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ आणि बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com