Rebellion in Mahayuti : महायुतीच्या बंडखोरांचे धाबे दणाणले, रवींद्र चव्हाणांचा अल्टिमेटम, म्हणाले, 'भविष्यातील संधीचा...'

Mahayuti News : राज्यातील ठिकठिकाणी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. ही बंडखोरी मागे घेण्याचे आव्हान सध्या महायुतीसमोर असून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments
Ravindra Chavan BJP Maharashtra New AppointmentsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. जवळपास सर्वच मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघडी अशी सरळ लढत होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यातील ठिकठिकाणी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. ही बंडखोरी मागे घेण्याचे आव्हान सध्या महायुतीसमोर असून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट करतानाच बंडखोरीबाबत मोठे विधान केले आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजेत, अशा नेत्यांना सूचना दिल्या आहेत. विधानपरिषदेच्या 17 जागेवर महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयी होतील. बंडखोरांनी वरिष्ठ नेत्याशी बोलून अर्ज माघारी घ्यावेत. आगामी काळात अर्ज मागे घेणाऱ्यांचा निश्चित विचार करू. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. महायुतीला तीन ठिकाणीची बंडखोरी टाळण्यास यश आले आहे, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments
Maharashtra Politics Live Update : विधानपरिषदेसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची नावे जाहीर

विधानपरिषद निवणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तीन पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत तीनही नेत्यांनी महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीवर भाष्य केले.

Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments
MLC Election : जळगाव विधानपरिषदेत छाननीनंतर 16 उमेदवारांचे अर्ज वैध ; पण 'त्या' एका अर्जाने गिरीश महाजनांची वाढली धाकधूक

विधान परिषद निवडणूक महायुती एकत्रित लढत आहे. तीन पक्षांनी ही निवडणूक एकत्रित लढ्यण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १७ जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. एनडीए देशात व राज्यात मजबूत रहावी यातही तीन पक्ष प्रयत्न करीत आहे. विरोधकांना अनेक ठिकाणी उमेदवार देखील मिळाले नाहीत, असे सुनील तटकरे म्हणाले.

Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments
Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरे अलर्ट; लोकसभेची पुनरावृत्ती विधान परिषदेला टाळणार, सावध हालचाली!

यावेळी बोलताना सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे म्हणाले, महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवत असल्याने आमचे सर्व ठिकाणचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास आहे. येत्या काळात महायुतीमधील बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील, त्यांच्याशी पक्षाकडून संपर्क साधला जात असल्याचे स्पष्ट केले.

Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments
Ahilyangar Politics : विधानपरिषद निवडणुकीत जोरदार घडामोडी, बाळासाहेब थोरातांनी नाव नाव सुचवले असतानाच शरद पवारांकडून खासदार पत्नीला उमेदवारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com