Ahilyangar Politics : विधानपरिषद निवडणुकीत जोरदार घडामोडी, बाळासाहेब थोरातांनी नाव सुचवले असतानाच शरद पवारांकडून खासदार पत्नीला उमेदवारी

Sharad Pawar NCP Politics : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अहिल्यानगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून बाळासाहेब थोरात यांनी दोन नावे सुचवली आहेत.
Ahilyangar Politics; Sharad Pawar, Balasaheb Thorat
Ahilyangar Politics; Sharad Pawar, Balasaheb Thoratsarkarnama
Published on
Updated on

Ahilyangar Political News : अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून प्राजक्त तनपूरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अद्याप त्यांनी निरोप आलेला नाही तोच काँग्रेसकडून दोन नावे आघाडीवर आहेत. ही दोन्ही नावे बाळासाहेब थोरात यांनी सुचवली असल्याने महाविकास आघाडीकडून यातील एकाला उमेदवारी मिळेल असा तर्क बांधला जात आहे.

अशा राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने येथे उमेदवार देवून महाविकास आघाडीसह विरोधकांना धक्का देण्याचे काम केल्याची माहिती मिळत आहे. खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांची विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात एन्ट्री होणार आहे. त्या सोमवारी (ता.१) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपने शरद पवार यांचा तगडा उमेदवार फोडत तो आपल्या सोबत घेतला. प्राजक्त तनपूरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे. मात्र अद्याप त्यांना निरोप आलेला नाही. यामुळे भाजप त्यांचे नाव पुढे करणार की धक्कातंत्र वापरणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Ahilyangar Politics; Sharad Pawar, Balasaheb Thorat
Satara-sangli MlC Election: सांगली-सातारामध्ये दोन माजी मंत्र्यांचा पत्ता कट; विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांच्या निष्ठावंताला संधी

तसेच महाविकास आघाडीने देखील दंड थोपाटले असून भाजपविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसकडून दीप चव्हाण आणि करण ससाने या दोघांनाची नावे सुचवली आहेत. तर या दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या जागेवर काँग्रेस लढेल अशी शक्यता आहे.

तशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर करण्यात बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे. त्या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आघाडीत बिघाडी झाल्याची आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Ahilyangar Politics; Sharad Pawar, Balasaheb Thorat
MLC Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर धक्कादायक घडामोडी? एकनाथ शिंदेंच्या बैठकीत ट्विस्ट, नेत्यांना महत्वाचा सूचना

तसेच लंके यांच्या भूमिकेनंतर दीप चव्हाण, करण ससाने महाविकास आघाडीतील उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार की शेवटच्या क्षणी माघार घेणार हे पाहावे लागणार आहे. तसेच आता जिल्ह्याचे लक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्याकडे देखील लागले असून ते सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करतात का? हे पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com