Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरे अलर्ट; लोकसभेची पुनरावृत्ती विधान परिषदेला टाळणार, सावध हालचाली!

MLC Election Mahavikas Aghadi : विधान परिषद निवडणुकीत यंदा विरोधकांना फारसा वाव नाही. महायुतीने आधीच सूत्रे फिरवत विरोधकांना खिंडीत गाठण्याचे डावपेच आहेत. या संदर्भात विरोधक देखील अलर्ट आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MLC News : विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत महायुतीचा निर्णय सतत लांबणीवर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मात्र विजयाची शाश्वती नसली तरी सावध पावले टाकले आहेत. ऐनवेळी निर्णय बदलत जळगाव आणि नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपने शेवटच्या टप्प्यात गुगली टाकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अडचण केली होती. रावेर मतदार संघातून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे जोरदार लढतीची तयारी असताना एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी माघार घेतली होती.

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रयोगाने विरोधक यंदा अधिक सावध आहे. जळगाव आणि नाशिक येथे जिंकण्याची संधी कमी आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला या जागा सहज मिळणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

जळगाव मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार होता. त्यादृष्टीने विरोधकांना मॅनेज होतील असे उमेदवार टाळण्याचा प्रयत्न पक्षाने केला होता. त्यासाठी निष्ठावंत दिलीप खोडपे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सूचना प्रदेशाध्यक्षांनी दिल्या होत्या. मात्र, शेवटच्या टप्प्यात ज्याचे मतदार जास्त त्याला जागा देण्याचे धोरण महाविकास आघाडीने निश्चित केले आहे. त्यानुसार जळगाव आणि नाशिक या दोन्ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात आले आहेत. त्या दृष्टीने पक्षाने उमेदवारीसाठी सूचना केल्या आहेत.

या दोन्ही मतदारसंघांची भाजपची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. भाजप आर्थिकदृष्ट्या सक्षम इच्छुकांना संधी देणार हे स्पष्ट आहे. यात "लक्ष्मी दर्शन" पाळण्यासाठी विरोधकांचा उमेदवार मॅनेज करण्याचे डावपेच खेळले जाऊ शकतात.

Uddhav Thackeray
Jalgaon MLC Election: जळगाव विधान परिषदेची जागा कोणाला? गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

उद्धव ठाकरेंच्या सूचना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोणत्याही स्थितीत उमेदवाराचा अर्ज बाद होऊ नये. उमेदवाराने माघार घेता कामा नये या दृष्टीने राजकीय डावपेच आखण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुका जिंकण्याची संधी कमी असली तरी भाजपला सहज निवडणूक खिशात घालता येईल, अशी स्थिती राहू नये याची काळजी विरोधक घेत आहेत.

Uddhav Thackeray
MLC election : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला 2 मतदारसंघात धोक्याची घंटा : अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवार डेंजर झोनमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com