NCP Crisis : पार्थ पवारांनी घेतली CM फडणवीसांची भेट : तटकरे-पटेलांच्या भवितव्याबाबत चर्चा?

NCP Political Drama News : राष्ट्र्वादीत सर्व काही आलबेल दिसत नसल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच शनिवारी रात्री आणखी एक नवीन घडामोड घडताना दिसली.
evendra fadanavis, parth pawar
devendra fadanavis, parth pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये गेल्या चार दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. चार दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीत निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख कार्यकारिणी सदस्य असा करण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळेच तटकरे-पटेल नाराज असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमात रंगल्या आहेत.

त्यातच शनिवारी सुनील तटकरे यांनी नाराजीबाबत सूचक वक्तव्य केल्याने राष्ट्र्वादीत सर्व काही आलबेल दिसत नसल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच शनिवारी रात्री आणखी एक नवीन घडामोड घडताना दिसली. शनिवारी रात्री उशिरा पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असल्याचे पुढे आले आहे. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या बैठकीत तटकरे-पटेलांच्या भवितव्याबाबत चर्चा? झाली असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सध्या नाराजीनाट्य सुरु आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेत घडलेल्या अनेक गोष्टीबाबत स्पष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री आणखी एक नवीन घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवार हे शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि भेटीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

evendra fadanavis, parth pawar
Sunil Tatkare: सुनील तटकरे सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला! राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याच्या चर्चेमुळं भेटीला महत्व; नेमकं काय घडलं?

गेल्या चार दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कमालीचे सक्रिय झालेले पार्थ पवार हे शनिवारी एकटेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटायला गेले होते. त्यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत कोणतेच वरिष्ठ नेते नव्हते. त्यामुळे यावेळी या दोन नेत्यांमध्ये नेमकी कॊणत्या विषयावर चर्चा झाली असावी याचा कयास लावला जात आहे.

evendra fadanavis, parth pawar
Maharashtra Politics Live Update : पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याची बाब समोर आल्यानंतर या सगळ्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली होती. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे नाव निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत नसणे, ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले होते. निवडणूक आयोगाला नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीबाबत पत्र लवकरच पाठवले जाईल, असेही राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ही खरोखरच प्रिंटिंग मिस्टेक होती की सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना दिलेला अप्रत्यक्ष संदेश होता, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

evendra fadanavis, parth pawar
Maharashtra Politics Live Update : पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

त्यातच शनिवारी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या बैठकीत तटकरे-पटेल नाराज असल्याने या विषयावर चर्चा झाली असावी त्यासोबतच तटकरे-पटेल यांच्या भवितव्याबाबत यावेळी चर्चा? झाली असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

evendra fadanavis, parth pawar
Sunil Tatkare: सुनील तटकरे सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला! राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याच्या चर्चेमुळं भेटीला महत्व; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com