Amit Shah Politics : शरद पवारांचा तोफगोळा शहांनी परतवला; महाराष्ट्रात येऊन पुन्हा डिवचले...

Sharad Pawar Politics in Co-operative Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक असल्याचे अमित शाह म्हणाले.
Amit Shah  Sharad Pawar
Amit Shah Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बहुचर्चित मालेगाव दौरा आज झाला. यावेळी त्यांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या शेती प्रकल्पांचे लोकार्पण केले. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केले. शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनातही त्यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर पवारांनीही तडीपारीवरून शहांवर तोफ डागली होती. त्याला शहा आज शहा प्रत्युत्तर देणार का, याचीच आज चर्चा होती.

शहा यांनी सहकाराचे महत्व सांगताना पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शरद पवार दहा वर्षे केंद्रात कृषी मंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा मला प्रश्न पडतो. शरद पवार दहा वर्षे कृषी मंत्री असताना सहकारासाठी ठोस काम का करू शकले नाही. त्यांना सहकारासाठी स्वतंत्र खाते का निर्माण करता आले नाही. सहकार विभाग आजही अनेक समस्यांना सामोरे जातो आहे.

Amit Shah  Sharad Pawar
Uddhav Thackeray News : कोकणात भाजपचा ठाकरेंना दणका, नगरपंचायतीत पराभव; एका नगरसेवकानं केला गेम

शरद पवार यांनी केवळ संघटित पद्धतीचे राजकारण केले. सहकाराच्या माध्यमातून मार्केटिंग केली. साखर कारखाने आणि संस्था मजबूत व्हाव्यात, असे काम झाले नाही. शेतकऱ्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याचा घणाघात शहांनी केला. त्यामुळे आता शहांच्या या टीकेवर पवार कसा पलटवार करणार हे पाहावे लागेल.

दरम्यान, शहांनी कार्यक्रमात सहकार आणि शेती क्षेत्रातील काही प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आणि पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनापासून आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत.

Amit Shah  Sharad Pawar
Sharad Pawar News : राज्यात भूकंप कधी होतोय याची वाट पाहतोय; शरद पवारांनी हवाच काढली

शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन सहकार आणि शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाल्याने या विभागातील कामाला अधिक शिस्त प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, दादा भुसे, डॉ. विकास महात्मे, गिरीश महाजन आदी उपस्थित होते. निवृत्त जवानांच्या संस्थेचे संयोजक शिवाजीराव डोळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com