Shivsena News: मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप, विरोधकांना धक्का; तब्बल 25000 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Eknath Shinde News: 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली आहे. विरोधी पक्षातील नाराज बलाढ्य नेत्यांना गळाला लावण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसून येत नाही. तिकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून मराठवाडा पिंजून काढला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Latur News: एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांमुळे राजकारण तापलं आहे.महायुतीत सध्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावरुन मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून येत आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत काही जागांवरुन एकमत होत नसल्यानं विधान परिषदेच्या जागावाटपाचं घोडं अडून बसल्याचं चित्र आहे. याचदरम्यान,राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यासह राज्याला हादरवणारा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वापासून ते आजवर लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याच लातूरमध्ये शिवसेनेनं महाविकास आघाडीला मोठा सुरुंग लावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.28) लातूरच्या अहमदपुर येथे सुमारे एक ना दोन तब्बल 25 हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

अहमदपूर येथे 25000 कार्यकर्त्यांनी केलेला पक्षप्रवेश हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश असल्याची जोरदार चर्चा मराठवाड्यासह राज्याच्या राजकारणात सुरू आहे.या एवढ्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे लातूरमध्ये शिवसेनेची ताकद जबरदस्त वाढल्याचं बोललं जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या या कार्यकर्ता मेळाव्यातून त्यांच्या पक्षाची पुढील वाटचाल स्पष्ट करताना विरोधी बाकावरील महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.त्यांनी यावेळी लातूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आज 25 हजार जणांनी पक्षात प्रवेश केल्याचं म्हटलं.

Eknath Shinde
Neet Exam News: 'पेपरफुटी'मुळे मोठी नाचक्की; मोदी सरकार धाडसी निर्णय घेण्याच्या तयारीत; 'नीट'च्या परीक्षेत थेट लष्कराची 'एन्ट्री'

शिंदे म्हणाले, विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल,तर त्यांनी अहमदपूरमध्ये येऊन हा जनसागर पाहावा असं खुलं आव्हानही दिलं. याचदरम्यान,त्यांनी शिवसेनेत दाखल झालेली ही लोकं कोणत्याही लालसेनं नव्हे, तर शिवसेनेच्या प्रेमापोटी गोळा झाल्याची भावनाही शिंदेंनी या मेळाव्यात बोलून दाखवली.

मराठवाडा असो की संपूर्ण महाराष्ट्र,आज सर्वत्र शिवसेनेला भरभरून प्रेम मिळत आहे. "एक बार मैंने कमिटमेंट की, फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता," असं आपण दिलेला शब्द नेहमी पाळणारा नेता असल्याचंही ठणकावून सांगितलं.लातूरमधील शिवसेनेचा हा कार्यकर्ता मेळावा चर्चेचा विषय ठरला.

Eknath Shinde
IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी आयुक्तपदाचा 'चार्ज' घेताच भेसळखोरांना पहिला दणका; 48 तासांत 'FDA'च्या तीन मोठ्या कारवाया

तसेच शिवसेनेत गेल्या 3 वर्षांपासून पक्षप्रवेशाची मालिका अखंड सुरू असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.याचवेळी त्यांनी बच्चू कडू यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असल्यानं या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाल्याची भावनाही बोलून दाखवली. यावेळी त्यांनी आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच असल्याचं सांगतविरोधकांनाही खोचक टोला लगावला.

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी राज्यातील बहुतांश निवडणुका पार पडल्यानंतर आता पक्षसंघटनेवर मोठ्या प्रमाणात भर दिला असल्याचं दिसून येत आहे. 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली आहे. विरोधी पक्षातील नाराज बलाढ्य नेत्यांना गळाला लावण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसून येत नाही. तिकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून मराठवाडा पिंजून काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com