Abdul Sattar News : शिवसेना नव्हे, 'सत्तारसेना' ; शक्तीप्रदर्शनातून देणार संदेश!

Shiv Sena stays away from Abdul Sattar's memorial service : कायम सत्ता, मंत्रीपदाचा रुबाब दाखवणारे अब्दुल सत्तार सध्या स्वतःला असुरक्षित समजू लागले आहेत. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन ते देखील जिल्ह्याच्या ठिकाणी दाखवण्याचा सत्तार यांचा हा प्रयत्न
EX Minister Abdul Sattar News
EX Minister Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा आज वाढदिवस, तसा तो दरवर्षी मतदारसंघात जल्लोषात साजरा केला जातो. यावेळी मात्र पहिल्यांदाच तो मतदारसंघाबाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहे. याला विशेष कारण आहे, ते अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून डावलल्याचे. महाविकास आघाडी असो की महायुती दोन्ही सरकारमध्ये सत्तारांचे मंत्रीपद फिक्स असयाचे.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महायुतीने धोरण बदलले आणि काही जुन्या जेष्ठ, अनुभवी मंत्र्यांना नारळ देण्यात आला. अब्दुल सत्तार यांचे नाव यामध्ये आघाडीवर होते. आपल्या कामापेक्षा वादांमुळे राज्याला परिचित असलेल्या अब्दुल सत्तारांची अवस्था मंत्रीपद नसल्याने पाण्याशिवया माशासारखी झाली आहे. याही पेक्षा जास्त दुःख सत्तारांना याचे आहे की त्यांच्याऐवजी शिवसेनेने संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्रीपद आणि आता जल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

EX Minister Abdul Sattar News
Abdul Sattar News : अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसासाठी लाखोंच्या सभा होणारे मैदान निवडले!

कायम सत्ता, मंत्रीपदाचा रुबाब दाखवणारे अब्दुल सत्तार सध्या स्वतःला असुरक्षित समजू लागले आहेत. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन ते देखील जिल्ह्याच्या ठिकाणी दाखवण्याचा सत्तार यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. कुठल्याही कार्यक्रमात गर्दी जमवणे हे सत्तार यांच्यासाठी अगदीच सोपे असते. त्यामुळे सहाजिकच आजच्या त्यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर हजारोंची गर्दी होणार यात काही शंका नाही. पण ही गर्दी शिवसेना या त्यांचा पक्षाची नाही तर 'सत्तारसेने'ची असेल.

EX Minister Abdul Sattar News
Sanjay Shirsat : मंत्री होताच संजय शिरसाट हिशोब चुकता करणार! सत्तारांवर सोडला बाण..

सिल्लोड-सोयगाव मतदारंघातून पंचवीस हजारावर लोक सत्तारांच्या वाढदिवसाला संभाजीनगरात दाखल होणार आहेत. याशिवाय फुलंब्री, पैठण, वैजापूर या भागातून सत्तार यांना मानणारे त्यांचे समर्थक नेते पाच-दहा हजार लोकांची गर्दी जमवून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान गच्च भरवण्यात यशस्वी होतील, असे दिसते. या गर्दीसमोर अब्दुल सत्तार आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे बोलतात? की मग 'अडीच वर्षांनी मी पुन्हा येईन' या आशेमुळे संयमित बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

EX Minister Abdul Sattar News
Shivsena Eknath Shinde: उत्साह वाढलेली शिंदेंची शिवसेना म्हणते, ठाकरे समर्थकांना ‘नो एन्ट्री’

नेतृत्वाविरोधात उघडपणे बोलणे, विरोधात भूमिका घेणे सत्तार यांच्यासाठी नवे नाही. परंतु इतरवेळची राजकीय परिस्थिती आणि सद्य स्थिती यात बराच फरक आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता सत्तार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा युतीच्या नेत्यांवर थेट टीका करणार नाही. त्यांच्या निशाण्यावर अर्थातच नव्यानेच मंत्री झालेले आणि सिल्लोडमधून गुंडगिरी संपवण्याला सुरुवात करणार असल्याचे सांगत डिवचणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट असतील.

EX Minister Abdul Sattar News
Abdul Sattar News : अब्दुल सत्तार म्हणतात, नाराज नाही, पण अडीच वर्षांनी 'मी पुन्हा येईन',..

मंत्री कोणीही असो, पण जिल्ह्यातील पक्षाची सुत्रे आपल्या हाती रहावीत, असा प्रयत्न अब्दुल सत्तार आजच्या वाढदिवस आणि त्यातून केल्या जाणआऱ्या शक्तीप्रदर्शनातून असणार आहे. शहरातील पोस्टर आणि बॅनरबाजीतून शक्ती दाखवणाऱ्या अब्दुल सत्तारांची दखल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्ष घेणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com