

Beed News : बीड येथे 45 लाखांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला वन विभागाचा अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्या नांदेड येथील घराची झडती घेण्यासाठी पथक दाखल झाले आहे. परंतु लखमावाड याचे आई-वडील पुण्याला गेलेले असल्यामुळे पथक घराबाहेर उभे आहे. वरिष्ठांकडून काय आदेश येतात? त्यानंतर पुढील कारवाई ठरणार आहे.
बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला लखमावाड उपस्थिती होता. बैठक संपवून घरी जाताच त्याने 45 लाखांची लाच स्वीकारली. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर बीड येथील लाचखोर वनविभाग अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्या नांदेड येथील घराची झाडाझडती घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक सायंकाळी धडकले. लखमावाड हा मुळचा नांदेडचा असून येथील घरी त्याचे आई-वडील राहत असल्याची माहिती आहे. नांदेड शहरातील आनंदनगर भागात लखमावाड यांचे निवासस्थान आहे. याच घरी झाडाझडती घेण्यासाठी पथक दाखल झाले होते.
परंतु, सध्या त्याच्या घरी कोणीच नसल्याने एसीबीच पथक घरा बाहेर थांबून आहे. लाच घेताना मोठा अधिकारी पकडला गेला तर त्याच्या घराची झाडाझडती घेतली जाते. घरातील दागिने , रोख रक्कम , स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. याच कारवाईसाठी एसीबीचे पथक नांदेडच्या निवासस्थानी दाखल झाले
मात्र, या निवासस्थानी वनविभाग अधिकारी श्रीनिवास लखमावाड याचे कुटुंबीय कोणीच नव्हते. आई-वडील पुण्याला असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील कारवाईला ब्रेक लागला असून पथक वरिष्ठांच्या पुढील आदेशाची वाट पाहत आहेत. बीड येथे लखमावाड याने घेतलेल्या 45 लाखांच्या रक्कमे पैकी फक्त पाच लाखांच्या नोटा या खऱ्या, तर उर्वरित चाळीस लाखाच्या नोटा डमी असल्याचेही कारवाईतून समोर आले आहे.
वनविभाग अधिकारी श्रीनिवास लखमावाड याने 2025-26 मधील वृक्ष लागवडीची बिले मंजूर करून देणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.