Dharashiv politics : धाराशिवमधून निवडणूक लढतो म्हणणाऱ्या अंबादास दानवेंवर ओम राजेनिंबाळकर बरसले; म्हणाले “नुसते चॅलेंज स्वीकारून चालत नाही, माणसात राहावे....”

Dharashiv political dispute News : दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वाद चिघळला आहे. या वादातून कोणीच माघार घेण्यास तयार नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
Omraje Nimbalakar, ambadas danve
Omraje Nimbalakar, ambadas danve Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : गेल्या चार दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार व माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वाद चिघळला आहे. या वादातून कोणीच माघार घेण्यास तयार नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीच्या निमित्ताने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अंबादास दानवे यांनी ओम राजेनिंबाळकर विरोधात निवडणूक लढण्याचे चॅलेंज स्वीकारत पक्षाने सांगितले तर धाराशिवमधून निवडणूक लढवणार, महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला आता ओम राजेनिंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “नुसते चॅलेंज स्वीकारून चालत नाही, माणसात राहावे लागते,” असा टोला लगावला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच धाराशिव जिल्हयातील दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करून नुकसानीची पाहणी केली होती. या दौऱ्यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह महायुतीचे बडे नेते उपस्थित होते. त्या सीएम फडणवीस यांच्या दौऱ्यावेळीचा खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा फोटो ट्विट करीत कोण होतास तू काय झालास तू ''. अशी टीका आमदार अंबादास दानवेंनी फोटो ट्विट करीत केली होती.

Omraje Nimbalakar, ambadas danve
Maharashtra Political Live Update : 'आम्हीच काय तिथे कोणीच काही काजू, बदाम खाण्यासाठी जात नाही....':मंत्री पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारलं

दानवेंनी केलेल्या या टीकेला उत्तर देताना राजेनिंबाळकर यांनी दानवेंना 2029 ला धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. एकदा जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे स्वतःची लायकी कळेल, अशी टीका त्यांनी केली होती. ते आव्हान स्वीकारत अंबादास दानवे यांनी राजेनिंबाळकर विरोधात निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. पक्षाने सांगितले तर धाराशिवमधून निवडणूक लढवणार, महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Omraje Nimbalakar, ambadas danve
Maharashtra drought declaration : बळीराजा होरपळला, सरकारचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर! दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर; नेतेमंडळी आक्रमक

त्यानंतर खासदार ओम राजेनिंबाळकर दानवेंवर जोरदार टीका करताना म्हणाले, “नुसतं चॅलेंज स्वीकारून चालत नाही, माणसात राहावे लागते,” असा टोला लगावला. “पक्षाने सांगायची गरज नाही; लढायचे असेल तर लढावे, मोस्ट वेलकम,” असे म्हणत ओमराजेंनी दानवेंना पुन्हा आव्हान दिले. त्यामुळे या दोन नेत्यांमधील हे शीतयुद्ध कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Omraje Nimbalakar, ambadas danve
Dharashiv News : ओम राजेनिंबाळकरांचे चॅलेंज अंबादास दानवेंनी स्वीकारलं; धाराशिवमधून खासदारकीची निवडणूक लढणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com