Jalna Loksabha Constituency: रावसाहेब दानवेंच्या प्रचारसभेत अमित शाहांनी जालनावासियांना दिली 'ही' मोठी गॅरंटी

Raosaheb Danve News : आमच्याकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. तुमच्याकडे याचे उत्तर आहे का?
Amit Shah
Amit ShahSarkarnama

Jalna News : रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. तुम्ही त्यांना पाच वेळा निवडून दिले, आता सहाव्यांदा निवडून द्या, जालन्याला सगळ्या क्षेत्रात टाॅपरवर नेण्याची ग्वाही मी तुम्हाला देतो, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जालनेकरांना आवाहन केले.

रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) मिळणारे प्रत्येक मत हे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. तुम्ही दानवेंना सहाव्यांदा निवडून द्या, मी तुम्हाला शब्द देतो ते खूप मोठे नेते होतील, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित महाविजय संकल्प मेळाव्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

Amit Shah
Narendra Modi: अदाणी-अंबानीकडून राहुल गांधींनी पैसे घेतल्यामुळेच ते आता..., PM मोदींचा गंभीर आरोप

रावसाहेब दानवे यांना जिंकवण्यासाठी मी इथे आलो आहे, असे भाषणाच्या सुरुवातीलाच सांगत शाह यांनी इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचारी असल्याचा हल्ला चढवला. त्यांच्या नेत्यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली जात आहे. दहा वर्षात 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी अन् दुसरीकडे ज्यांच्यावर 25 पैशाचाही आरोप लावू शकत नाही, असे आमचे नरेंद्र मोदी.

एकीकडे थोडी गरमी वाढली की बॅकाँक, थायलंडला जाणारे राहुल गांधी आणि एकही दिवस सुटी न घेणारे नरेंद्र मोदीजी. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राम मंदिराचा प्रश्न रखडवला तो मोदींनी निकाली काढला आणि तिथे भव्य राम मंदिर उभारले. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर या लोकांनी बहिष्कार टाकला. वोट बॅंक नाराज होईल म्हणून ते आले नाहीत. पण आम्ही वोट बॅंकेला घाबरत नाही, असा टोला शाह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खर्गेसाहेब, तुम्ही ऐंशी वर्षाचे झालात पण तुम्हाला कश्मिरचे महाराष्ट्र आणि राजस्थानशी काय नाते आहे हे माहित नाही. मोदींना तुम्ही दुसऱ्यांदा पंतप्रधान केले आणि त्यांनी कश्मिरमधून कलम ३७० हटवले. आतंकवाद, नक्षलवाद मोदींनी संपवला. 80 कोटी गरिबांच्या आयुष्यात बदल घडवला. नल से जल, गॅस सिलेंडर, पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, कोरोना काळात मोफत दोन लस दिल्याचे सांगतानाच कोरोना आला तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे मित्र भ्रष्टाचार करत होते, अशी टीकाही शाह यांनी केली.

जालन्यातील स्टील उद्योग केवळ महाराष्ट्र नाही तर देशाची शान आहे. आता इथे ड्रायपोर्ट बनल्याने इथले स्टील जगभरात जाईल आणि जालन्याचा डंका वाजेल. हे काम फडणवीस आणि मोदीजींनी केले. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. उद्धव ठाकरे येतील तेव्हा त्यांना विचारा ज्यांनी नामातंराला विरोध केला त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तेसाठी त्यांच्या पायाशी लोळण का घेतले? राम मंदिर झाले ते चांगले झाले की वाईट, कलम 370, ट्रिपल तलाक याबद्दलही उद्धव ठाकरेंना विचारा.

Amit Shah
Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदांचा राजीनामा, 'ते' वक्तव्य भोवलं

ते बोलू शकणार नाहीत, जे देश शरियाच्या आधारावर चालवू पाहतात त्यांच्यासोबत ते गेले आहेत. केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत जाऊन बसलेत, अशी टीका शाह यांनी केली. पाकिस्तान राहुल गांधींचे गुणगाण का गातोय, असा प्रश्न मला दिल्लीत पत्रकाराने विचारला. पाकिस्तानचा अजेंडा भारतात कोणी चालवत असेल तर ते राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस आहे, असा गंभीर आरोप अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणात केला.

हे पुन्हा सत्तेवर आले तर ते राम मंदिराला कुलूप लावण्याचे काम करु शकतात. जर ते जिंकले तर त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? आमच्याकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. तुमच्याकडे याचे उत्तर आहे का? ममता बॅनर्जी, स्टॅलिन, राहुल गांधींना बनवायचे का? की दरवर्षी पंतप्रधान बदलणार आहात ? असा टोला लगावतानाच हा भारत देश आहे इथे असे चालणार नाही, असा इशारा शाह यांनी यावेळी दिला.

Amit Shah
Ajit Pawar Vs Nilesh Lanke : शरद पवारांना उद्देशून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर नीलेश लंकेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोदींकडे दहा वर्षांच्या कामाचा हिशोब आहे आणि 25 वर्षाचा अजेंडा आहे. देशाला जगात नंबर एकचे राष्ट्र बनवायचे आहे. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी मोदींना पंतप्रधान करायचे आहे. महाराष्ट्राला मोदींजीच्या काळात भरभरून निधी दिला. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्योगात राज्याला नंबर एकवर नेऊन ठेवले, असे गौरवोद्दगार शाह यांनी काढले. भाषणाच्या शेवटी रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून द्या, ते खूप मोठे नेते होणार आहेत. जालना सगळ्या क्षेत्रात टाॅपवर आणण्याचे काम मोदीजी करतील, अशी ग्वाही शाह यांनी दिली.

Amit Shah
Hasan Mushrif News : हसन मुश्रीफांनी परदेश सहलीसाठी जनतेकडून मंजूर करून घेतली रजा अन् आभारही मानले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com