Anjali Damania : अंजली दमानियांनी लक्ष्मण हाकेंचे 'ते' फोटो दाखवले, धनंजय मुंडेंच्या समर्थकाचेही घेतले नाव

Anjali Damania showed showed Photo Laxman Hake : अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यासोबत जेवण करताना लक्ष्मण हाके यांचे फोटो ट्विट करत एका व्यक्तीने मला हा फोटो पाठवल्याचे म्हटले होते.आत्ता त्यांनी आणखी काही फोटो ट्विट केले आहेत.
Anjali Damania  Laxman Hake
Anjali Damania Laxman Hake sarkarnama
Published on
Updated on

Anjali Damania News : संतोष देशमुख हत्येप्रकरणात ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला होता. ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, अडकवले जात असल्याचे देखील हाके म्हणाले.

अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यासोबत जेवण करताना लक्ष्मण हाके यांचे फोटो ट्विट करत एका व्यक्तीने मला हा फोटो पाठवल्याचे म्हटले होते.आत्ता हवेत गोळीबार करताना फोटो व्हायरल झालेल्या धनंजय मुंडे यांच्या समर्थकासह हाके यांचा आणखी एक फोटो दमानिया यांनी ट्विट केला आहे.

'आणि एक फोटो आला …या वेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थक कैलाश फड यांच्या बरोबरचा हा फोटो. हेच कैलास फॅड व त्यांचे सुपुत्र हे २०२४ च्या निवडणुकीत बूथ वर हैदोस घालत होते', असे ट्विट दमानिया यांनी केले आहे. या फोटोमध्ये कैलास फड यांच्यासोबत लक्ष्मण हाके देखील दिसत आहे.

Anjali Damania  Laxman Hake
Amit Shah News : अजितदादांनी घेतली अमित शाहांची भेट? दिल्लीतील बैठकीबाबत कमालीची गुप्तता

हाके यांचे नाव न घेता अंजलिया दमानिया यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे त्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांसोबत लक्ष्मण हाके यांचे देखील संबंध असल्याचे अप्रत्यक्ष दमानिया सुचवत असल्याचे दिसते.

फड यांच्या अटकेमागे दमानिया

कैलास फड यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजलिया दमानिया यांनी पूर्वी ट्विट केला होता. या ट्विटनंतर बीड पोलिसांनी याची तत्काळ दखल घेत फडच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.

निवडणुकीसाठी वाल्मिक अण्णा चालतो

लक्ष्मण हाके यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला आहे. ते म्हणाले, वाल्मिक अण्णाचे फोटो जयंत पाटलांच्यासोबत आहेत. सुप्रिया सुळेंच्यासोबत आहेत. वाल्मिक अण्णा निवडणूक जिंकण्यासाठी चालतो, त्यांचे निवडणूक जिंकण्याचे स्किल्ससाठी त्याला जवळ करता. वाल्मिक अण्णाची माणसं राष्ट्रवादी वाढवतात पण टार्गेट करायला वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडेंच दिसतात.

Anjali Damania  Laxman Hake
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंचा विश्वासू मंत्री अडचणीत? निवडीला न्यायालयात चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com