Gramsevak Death : बीड हादरलं! अचानक बेपत्ता झालेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

Gramsevak Tukaram Gholap Death : पोलिसांनी ग्रामसेवक तुकाराम भागवत यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. घोलप यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन आणि पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Beed gramsevak Tukaram Gholap was found dead in the Sahyadri Devrai area after remaining missing for several days.
Beed gramsevak Tukaram Gholap was found dead in the Sahyadri Devrai area after remaining missing for several days.Sarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News, 12 Sep : बीड जिल्हा पुन्हा एकदा एका धक्कादाटक घटनेमुळे हादरून गेला आहे. जवळपास पाच ते सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ग्रामसेवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड शहरालगतच्या सह्याद्री देवराई परिसरात तुकाराम भागवत घोलप यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी दुपारी आढळून आला. विशेष म्हणजे, घोलप हे गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी आणि बागपिंपळगाव ग्रामपंचायतींचा कारभार पाहत होते.

घोलप मागील काही दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय आणि संबंधितांकडून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, या शोधमोहिमेदरम्यान शनिवारी सह्याद्री देवराई परिसरातून समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास परिसरात एक मृतदेह पडलेला दिसला. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या ग्रामसेवक तुकाराम घोलप यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Beed gramsevak Tukaram Gholap was found dead in the Sahyadri Devrai area after remaining missing for several days.
Manoj Jarange Backfut : अवास्तव मागण्या अन् निवडणुकीची भीती संपली; मनोज जरांगेंना शिंदे-फडणवीसांनी कसं एकाकी पाडलं? इनसाईड स्टोरी...

घोलप यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते नेमके कधी आणि कशा परिस्थितीत सह्याद्री देवराई परिसरात पोहोचले? त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Beed gramsevak Tukaram Gholap was found dead in the Sahyadri Devrai area after remaining missing for several days.
Ratnakar Mahajan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. घोलप यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन आणि पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या बीड ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com