Farmers Protest : शेतकरी आंदोलनामुळे IG मिश्रा ट्राफिकमध्ये अडकले : पोलिसांनी थेट गल्लीबोळातून बीडमध्ये आणले; वाहतूक शाखेला घेतले फैलावर

traffic on Dhule Solapur highway News : शहरातील बेशिस्त वाहतूक पाहून संतापलेल्या आयजी मिश्रा यांनी मुख्य बैठकीपूर्वीच जिल्हा वाहतूक शाखेला बोलावून चांगलेच झापल्याची माहिती समोर आली आहे.
Beed trafic
Beed traficSarkarnama
Published on: 
Updated on: 

नितीन चव्हाण

Beed News : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाडळसिंगी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाचा फटका विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) वीरेंद्र मिश्रा यांना बसल्याची घटना ताजी असतानाच, या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आयजींच्या ताफ्याला थेट खेडेगावांच्या रस्त्यांचा आणि शहरातील गल्लीबोळांचा आधार घ्यावा लागला. पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयजींचा ताफा मुख्य महामार्ग सोडून ग्रामीण भागातील आडमार्गाने बीड शहरात दाखल झाला.

या कसरतीत वाहतूक शाखेची चांगलीच तारंबळ उडाली. शहरातील बेशिस्त वाहतूक पाहून संतापलेल्या आयजी मिश्रा यांनी मुख्य बैठकीपूर्वीच जिल्हा वाहतूक शाखेला बोलावून चांगलेच झापल्याची माहिती समोर आली आहे. पाडळसिंगी टोलनाक्यावर शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने महामार्गावर वाहनांच्या मैलोन्‌मैल रांगा लागल्या होत्या. विभागीय परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप आणि जिल्हा क्राईम बैठकीसाठी बीडला येणे आवश्यक असल्याने, अखेर आयजी मिश्रा यांच्या ताफ्याचा मार्ग तातडीने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाडळसिंगी येथून ताफा वळवून मादळमोही, सावरगाव फाटा, सिरसमार्ग, सौदाना फाटा आणि मुर्शदपूर फाटा या ग्रामीण भागातील रस्त्यांवरून मार्ग काढत अंबिका चौकामार्गे बीड शहरात आणण्यात आला. आयजींचा ताफा अनपेक्षितपणे खेडेगावांतून आणि शहरातील गल्लीबोळातून येत असल्याचे कळताच स्थानिक पोलीस आणि बीड जिल्हा वाहतूक शाखेची मोठी धावपळ उडाली.

Beed trafic
Dhule News : भाजप आमदार थेट पंचायत समितीच्या गेटवर ठाण मांडून बसले; हजेरी तपासली अन् वर्षभरापासून बंद असलेलं बायोमेट्रिक उघड !

ग्रामीण रस्त्यांवरील वर्दळ आणि बीड शहरातील गल्लीबोळांत अस्ताव्यस्त उभी असलेली वाहने व कोंडी बाजूला सारताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले. खुद्द आयजींनाच या वाहतूक कोंडीचा आणि बेशिस्तीचा प्रत्यक्ष अनुभव आल्याने त्यांचा पारा चांगलाच चढला. शेतकरी आंदोलनामुळे बदललेला मार्ग आणि त्यात बीडच्या वाहतूक व्यवस्थेचे उघडे पडलेले पितळ, यामुळे आयजींचा हा दौरा सध्या पोलीस दलात आणि शहरात चर्चेचा हॉट टॉपिक ठरला आहे.

Beed trafic
Satara News: शिक्षण व्यवस्था हादरली! दहावीच्या उत्तरपत्रिका चक्क सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासल्या; व्हिडीओ पाहा

माझे हे हाल तर सर्वसामान्यांचे काय ?

​बीडमध्ये दाखल होताच आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी आपला संताप व्यक्त करत नियोजित क्राईम बैठकीपूर्वीच जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि त्यांना खडेबोल सुनावले. आज शहरात येताना माझे जर असे हाल होत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांना रोज या ट्रॅफिकमध्ये काय हाल सहन करावे लागत असतील? मला केवळ कागदोपत्री काम नको, तर प्रत्यक्षात रस्त्यावर काय चालले आहे ते आज यातून स्पष्ट दिसले आहे, अशा शब्दांत त्यांनी वाहतूक पोलिसांची कानउघाडणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.