

Shivsena News : बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीराव शिंदे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
चार महिन्यांपूर्वी परळीतील एका हाॅटेलमध्ये त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ते बचावले होते. आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.
बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बीड आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शिवाजीराव शिंदे यांच्यावर मे २०२६ मध्ये परळी शहरातील त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका अज्ञात युवकाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात शिंदे यांच्या हात-पायांवर गंभीर वार झाले होते. हाॅटेलमधील लोकांनी तेव्हा हल्लेखोराला रोखल्यामुळे शिंदे यांचे प्राण वाचले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.