Vilas Ghule Case : विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपीवर रुग्णालयातच हल्ला; CCTV फुटेज आले समोर

Mangesh Kadam Attack : मंगेश कदम याच्या पत्नीने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला यामुळे नवे वळण मिळाले आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी मंगेश कदमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Vilas Ghule Murder Case
Vilas Ghule Case Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Crime News : जूनमध्ये घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणात वेगवेगळ्या घटना, आरोप-प्रत्यारोप समोर येत आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या मुलाला या प्रकरणात अडकवण्यासाठी बीड कारागृहातून वाल्मीक कराड याने सुग्रीव कराड व केज पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्‍यांना फोन केल्याचा दावा केला होता.

याचवेळी सोनवणे यांनी विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपी मंगेश कदम यांना मारहाण करण्यात आली होती. त्याची पोलीसांनी तक्रार देखील घेतली नव्हती, असा आरोप केला होता. याच मंगेश कदम याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार घेत असताना जीवघेणा हल्ला झाल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

या आधारे मंगेश कदम याच्या पत्नीने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला यामुळे नवे वळण मिळाले आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी मंगेश कदमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Vilas Ghule Murder Case
Gram Panchayat Fund : पुढाऱ्यांची मनमानी संपली! गावाला मिळालेला पैसा कुठे खर्च केला? एका क्लिकवर गावकऱ्यांना दिसणार सगळा हिशोब...

याच रुग्णालयात मंगेशला मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून, मंगेश कदमची पत्नी छाया कदम यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी करत बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. केज तालुक्यातील टाकळी फाटा येथे 21 जून रोजी विलास घुले आणि त्यांच्या मित्रावर आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याचे समोर आले होते.

Vilas Ghule Murder Case
MPSC Students Protest : ठाकरेंच्या खासदाराने थेट अमेरिकेतून देवाभाऊंना सुनावले; MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन हलक्यात घेऊ नका!

यावेळी झालेल्या मारहाणीत चाकूचे वार झाल्याने विलास घुले यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मंगेश कदम हा देखील जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही नातेवाईकांनी मंगेश कदम आणि इतर काही जणांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयातील या कथित मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मंगेश कदम यांची पत्नी छाया कदम यांनी केली आहे. त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे याबाबत अर्ज दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com