MPSC Students Protest : ठाकरेंच्या खासदाराने थेट अमेरिकेतून देवाभाऊंना सुनावले; MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन हलक्यात घेऊ नका!

Rajabhau Waje Support MPSC Students Protest : "स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम करतात. शिक्षण आणि कोचिंगसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यासोबतच ते मानसिक संघर्षातून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे."
Rajabhau waje
Rajabhau wajesarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 07 Oct : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिला आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी आंदोलनाला समर्थन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

राजाभाऊ वाजे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून ते अमेरिकेत गेले आहेत. त्यामुळे पुण्यातील आंदोलनस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पाठवलेल्या स्वतंत्र पत्रातून त्यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात वाजे यांनी म्हटले आहे की, "स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम करतात. शिक्षण आणि कोचिंगसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यासोबतच ते मानसिक संघर्षातून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे.

Rajabhau waje
Gram Panchayat Fund : पुढाऱ्यांची मनमानी संपली! गावाला मिळालेला पैसा कुठे खर्च केला? एका क्लिकवर गावकऱ्यांना दिसणार सगळा हिशोब...

विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून पाहू नये," असेही वाजे यांनी म्हटले आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने सरकारने संवेदनशीलतेने त्याकडे पाहण्याची गरज आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

Rajabhau waje
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, काय घडलं नेमकं?

दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि अनिश्चितता दूर करण्यासाठी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही वाजे यांनी केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने काही आश्वासने दिली असतील, तर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांचे निराकरण करावे, असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com