BJP News : डॉक्टरांच्या निवडणुकीतही भाजपची एन्ट्री; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसाठी मोर्चेबांधणी

Political News : या निवडणुकीत ऑफिशियल आयएमए महाराष्ट्र पॅनलला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे. या पॅनलच्या उमेदवारासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.
BJP News
BJP News Sarkarnama
Published on
Updated on

Latur Poliltics News : लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपने एकही निवडणूक सोडायची नाही, असा चंग बांधला आहे. यातूनच आता डॉक्टरांच्या निवडणुकीत देखील हा पक्ष उतरला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्नित असलेल्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत या पक्षाने उडी घेतली आहे.

यासाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीतील विजयासाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची निवडणूक होत आहे. यात नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाते. या नऊ जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. रविवारी मतदान होणाऱ्या या निवडणुकीत भाजपही (BJP) नशीब आजमावत आहे.

BJP News
Maharashtra Live Updates : खळबळजनक! लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात शिरला एक बुरखा घातलेला संशयित व्यक्ती

राज्यभरात होऊ घातलेल्या या मतदान प्रकियेत लाखांवर सदस्य सहभागी होणार आहेत. लातूर जिल्ह्यात 780 सदस्य आहेत. यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मतदान होणार आहे. या निवडणुकीत ऑफिशियल आयएमए महाराष्ट्र पॅनलला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे. या पॅनलच्या उमेदवारासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

BJP News
Maharashtra Politics Update : दिवसभरात काय घडल्या राजकीय घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर

यासाठी लातूर येथे जिल्ह्याची बैठक घेण्यात आली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

BJP News
BJP News : महापालिकेत भाजपच्या वाट्याला येणार पाच स्वीकृत सदस्य, अन् 90 इच्छुकांनी घेतले अर्ज! मंत्री सावेंची डोकेदुखी पुन्हा वाढणार

बैठकीत या पॅनलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. या निवडणुकीत मतदार असलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधला जात आहे, यासाठी जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.

BJP News
Maharashtra local body elections: उद्धव, राज ठाकरेंना घरचा आहेर; विश्वासू नेताच म्हणाला, 'महाराष्ट्र पालथा घातला असता तर आकडे....' .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com