Shivsena News: मोठी बातमी: जंतर मंतरवरचं आंदोलन गाजवलेल्या 'सीजेपी'च्या दिपकेंना शिवसेनेचे दोन बडे नेते भेटले

CJP VS BJP: भाजपच्या स्थानिक किंवा राज्य पातळीवरील कुठल्याही नेत्याने अद्याप शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आता बच्चू कडू यांनी घेतलेल्या अभिजीत दिपके यांच्या भेटीवर कुठलेही भाष्य केलेले नाही.
Abhijeet Dipke cjp.jpg
Abhijeet Dipke cjp.jpgSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena politics : कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते बच्चू कडू हे आज छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील त्यांच्या घरी दाखल झाले. नीट पेपरफुटी प्रकरणावर दिल्लीतील जंतर-मंतरवर 36 दिवस आंदोलन करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर अभिजीत दिपके काल दिल्लीहून आपल्या घरी आले आहेत.

दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या आई वडिलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. अभिजीत दिपके व त्यांचे कुटुंबीय आपले जवळचे नातेवाईक असून आपला त्यांच्याशी 25 -30 वर्षांपासूनचा संबंध असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले होते.

राज्यातील महायुती आणि केंद्रातील एनडीए सरकारचा भाग असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपकेच्या कुटुंबांची भेट घेतल्याने नवा वाद निर्माण झाला होता. ही भेट भाजपच्या नेत्यांना खटकली असली तरी आज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी ओळखले जाणारे माजी आमदार बच्चू कडू यांनीही अभिजीत दिपके यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यापासून अभिजीत दिपके आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवत आहे. प्रसारमाध्यमांना आपल्या घरूनच प्रतिक्रिया देणाऱ्या दिपके यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

Abhijeet Dipke cjp.jpg
Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांना दोषारोप नोटीस, 16 कोटींच्या नुकसानीचा ठपका

बच्चू कडू हे गुरुवारी (ता.30) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अभिजीत दिपके यांच्या वाळूज येथील निवासस्थानी दाखल झाले. मोजक्या कार्यकर्त्यांसह ते अभिजीत दिपके यांच्या भेटीसाठी घरात गेले. बराच वेळ बच्चू कडू आणि अभिजीत दिपके यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. आजच माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी आपल्याला भाजपकडून पक्षात येण्यासाठी ऑफर आणि धमकी दिली जात असल्याचा खुलासा केला.

तर यापूर्वी काँग्रेसचे दिल्लीतील नेते कपिल सिब्बल यांनी अभिजीत दिपके यांना काँग्रेस पक्षाकडून खासदार करण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट यांनी दिपके कुटुंबीयांची भेट घेतली होती. तर त्या पाठोपाठ आज बच्चू कडू यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत चर्चा केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Abhijeet Dipke cjp.jpg
Sandeep kshirsagar : अजित पवारांकडे पाहून तुम्हाला सत्ता दिली; भ्रमात राहू नका जनता धडा शिकवेल; संदीप क्षीरसागर यांचा पंडितांना इशारा!

दिल्लीत जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेली अमानुष मारहाण आणि बळाचा वापर या विरोधात अभिजीत दिपके अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. आज दिपके यांनी थेट अमित शहा यांच्यावरच हल्लाबोल चढवला. दिल्ली पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही अमित शहा यांच्या आदेशावरूनच झाल्याचा आरोप करत दिपके यांनी अमित शहा यांच्याच राजीनामाची मागणी केली होती.

केंद्रातील मोदी सरकार विरोधात आक्रमक झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांना असलेली आपुलकी पाहता भाजप आणि शिवसेनेमध्ये यावरून वादावादी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Abhijeet Dipke cjp.jpg
BJP News: दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर घरी पोहोचताच अभिजीत दिपकेंनी आरोपांचा बॉम्ब टाकला; भाजपचंही जोरदार प्रत्युत्तर

भाजपच्या स्थानिक किंवा राज्य पातळीवरील कुठल्याही नेत्याने अद्याप शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आता बच्चू कडू यांनी घेतलेल्या अभिजीत दिपके यांच्या भेटीवर कुठलेही भाष्य केलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com