CM Fadnavis Tuljapur visit : अधिवेशनानंतर तुळजापुरात पाऊल ठेवताच सीएम फडणवीस काय घोषणा करणार? तीर्थक्षेत्र विकास आराखाड्याचा घेणार आढावा

Devendra Fadnavis announcements News : अधिवेशनानंतर तुळजापुरात पाऊल ठेवताच सीएम फडणवीस काय घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यांनतर पहिल्यांदाच शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यासोबतच यावेळी ते तुळजाभवानी मातेच्या मंदिराची पाहणी करणार आहेत. यावेळी ते तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखाड्याबाबतचा आढावा घेणार आहेत. अधिवेशनानंतर होत असलेल्या या दौऱ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ते सोलापुरहून तुळजापुरला येणार आहेत. यावेळी ते तुळजाभवानी मातेचे दर्शन करून मंदिराची पाहणी करणार आहेत. यावेळी ते तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखाड्याबाबतचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यावेळी ते काय सूचना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra BJP Target : महाराष्ट्र भाजप 'टार्गेटच्या' जवळ; सहा दिवसात करणार ऐतिहासिक कामगिरी

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते तुळजापुरमध्ये तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यासोबातच ते मंदिराची पाहणी करून या ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेणार असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis
BJP state president election: शिस्तप्रिय भाजपला 'त्या' अलिखित नियमाचा विसर ? मंत्रिमंडळात समावेश अन् मुदत संपल्यानंतरही प्रदेशाध्यक्षपदाची निवड 'वेटिंग'वरच...!

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. पंढरपूर दौऱ्यात ते श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिर कामाची पाहणी करणार आहेत. विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत. फडणवीसांच्या तातडीने होणाऱ्या दौऱ्यात पंढरपूरसाठी काय घोषणा होणार का, याची उत्सुकता आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Politics: अधिवेशनाचे सुप वाजले; गिरीश महाजन अद्यापही वेटिंग वरच!

फडणवीस हे तुळजापूरहून सकाळी साडेअकराच्या सुमारास पंढरपूरला येणार आहेत. पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते मंदिराची पाहणी करणार आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे, त्यासाठी राज्य सरकारने 74 कोटी रूपयांचा निधी दिली आहे. या कामाचाही ते आढावा घेतील, अशी माहिती आहे.

Devendra Fadnavis
Ajit Pawar : 'अधिवेशनात पाच दहा मिनिटे हजेरी लावल्याने...'; अजितदादांनी उद्धव ठाकरेंच सगळंच काढलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com