Dharashiv ZP Politics: धाराशिव झेडपीत भाजपचा अध्यक्ष नाहीच? शिवसेनेतील नेत्याच्या एका पोस्टने खळबळ

Dharashiv Zilla Parishad BJP president controversy: गेल्या चार दिवसापासून दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या चर्चा सुरु असल्या तरी एकमत होत नसल्याचे समजते. त्यातच धाराशिव झेडपीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा अध्यक्ष होणार की नाही यावरून चर्चा रंगली आहे.
Ekanth Shinde
Ekanth Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv BJP politics: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, झेडपी अध्यक्ष निवडीसाठी चार दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, सत्तास्थापनेबाबतचा फॉर्म्युला ठरत नसल्याने भाजप, शिंदे यांच्या शिवसेनेतील तिढा कायम आहे.

गेल्या चार दिवसापासून दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या चर्चा सुरु असल्या तरी एकमत होत नसल्याचे समजते. त्यातच धाराशिव झेडपीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा अध्यक्ष होणार की नाही यावरून चर्चा रंगली असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याची पोस्ट चर्चेत आली आहे.

धाराशिव जिल्ह्यतील नागरिकांनी एकसंध महायुतीला बहुमत देऊन बुचकळ्यात टाकले आहे. 54 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या धाराशिव झेडपीत पक्षीय बलाबल पहिले तर भाजपचे 19, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, काँग्रेसचे 3 अपक्ष व इतर पक्षाचे 4 सदस्य निवडून आले आहेत. महायुती एकत्र आल्यास बहुमतपेक्षा अधिकचे संख्याबळ आहे. मात्र, भाजप व तानाजी सावंत गटाचे फारसे संख्या नाही. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत तिढा निर्माण झाला होता.

Ekanth Shinde
BJP municipal politics : भाजप नेत्यांची 'लाडकी' मंडळी वेटिंगवर! पराभूत उमेदवारांना मागच्या दाराने संधी मिळणे अवघड; स्वीकृत नगरसेवक पदासाठी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य

आठ दिवसापूर्वीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी बैठक झाली होती. त्यावेळी पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत स्थानिक पातळीवर बोलणी करून महायुती करण्याच्या सूचना शिंदे यांनी भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी दिल्या होत्या.

या बैठकीला पालकमंत्री प्रताप सरनाईक, भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर बैठकही झाली. मात्र, पंचायत समिती सभापती निवडीवेळीच महायुतीमध्ये एकमत झाले नाही.

आठ पंचायत समितीपैकी पाच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सभापती झाले आहेत तर तीन ठिकाणी भाजपचे सभापती झाले आहेत. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मोठे यश मिळाले आहे.

त्यामुळे याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढला आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप व शिंदे शिवसेनेची बरोबरी झाली होती. जिल्ह्यात दोघांचेही चार-चार नगराध्यक्ष झाले होते.

Ekanth Shinde
Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

त्यातच आता झेडपी अध्यक्षाची निवड शुक्रवारी होणार आहे. मात्र, सत्तास्थापनेबाबतचा फॉर्म्युला ठरत नसल्याने भाजप व शिंदे शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा धाराशिवमध्ये जोरदार रंगली आहे.

त्यामध्ये त्यांनी धाराशिवमधील संघ भाजपच्या जुने नेते कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाची बाजू समजून घ्यावी. आमचा विरोध भाजपचा झेडपी अध्यक्ष बसवायला अजिबात नसता. पण राणा पाटील यांच्या हिणकस राजकारणाला नक्की होता अन् राहणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार, खासदारांच्या घरात स्थानिक स्वराज्य संस्थेचे तिकीट न देण्याची पॉलिसी ठरवली होती. पण राणा पाटलांनी भाजपच्या त्या भूमिकेला हरताळ फासत त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. स्वतःच्या हट्टासाठी भाजपमधील कर्तृत्वान महिला कार्यकर्त्यांना बरोबर खड्यासारखे बाहेर केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Ekanth Shinde
Congress News: भाजपचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; एकाचवेळी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

भाजपमध्ये (BJP) इतर कुणीही ओपन महिला निवडून आली नाही पाहिजे. याची खबरदारी त्यांनी घेतली होती. त्यामुळे या पाडापाडीच्या राजकारणामुळे भाजपचे निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार पराभूत झाले. त्याचा फटका सत्तेच्या गणितावर बसला. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता त्या अध्यक्ष असतील, असे परस्पर सांगितले जाऊ लागले.

आम्ही तरीही शांतच होतो. पण जेंव्हा शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आणलेले आमचे दोन सदस्य पळवून नेले आणि शिवसेना पक्षात फूट असल्याचे जाणीवपूर्वक सांगितले जाऊ लागले. मग मात्र आमच्या पक्षाची एकजूट राखण्यासाठी आम्हाला भूमिका घ्यावी लागली.

शिवसेना पक्षातील काही नेते महायुती तोडत आहेत, अशी आवयी उठवली गेली. त्यात तथ्य नव्हते हे मतदार बांधवांना समजाऊन सांगण्याची भूमिका आम्ही घेतली. आम्ही शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना येथील परिस्थितीची माहिती दिली. त्याच सोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर देखील वरील माहिती घातली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी दिली.

Ekanth Shinde
BJP Politic's : भाजपचे 7 पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे; 'या' नेत्यांवर गटनेत्याची जबाबदारी!

केदार यांच्या या पोस्टमुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. उमरगा पंचायत समिती निवडणुकीत वेगळाच पॅटर्न राबवला असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. त्यामुळे या उमरगा येथील या वेगळ्याच समीकरणाची चर्चा रंगली असताना आता झेडपी अध्यक्षपदासाठी कोणता पॅटर्न राबवला जाणार? याची उत्सुकता या निमित्ताने शिगेला पोहचली आहे.

Ekanth Shinde
Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

त्यातच योगेश केदार यांनी 15+11+ 3 असा फॉर्म्युला सांगितला आहे. त्यानुसार शिंदे शिवसेनेचे 15 उद्धव ठाकरे सेना 7, काँग्रेस 3, बंडखोर 1 असे एकूण 11 व अपक्ष 3 असे एकूण 29 एकत्र आले असल्याचा आकडा सांगितला आहे.

तर दुसरीकडे याला प्रत्युत्तर म्हणून भाजपमधील मंडळींनी 19+6+7+4 असा 36 चा फार्म्युला सांगितला आहे. भाजपचे 19, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 (तानाजी सावंत वगळून दुसरा गट) , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, अपक्ष व इतर पक्षाचे 4 असे एकूण 36 चा आकडा जुळला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता शुक्रवारी कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार? याची उत्सुकता मात्र शिगेला पोहचली आहे.

Ekanth Shinde
Congress News: भाजपचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; एकाचवेळी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com