BJP municipal politics : भाजप नेत्यांची 'लाडकी' मंडळी वेटिंगवर! पराभूत उमेदवारांना मागच्या दाराने संधी मिळणे अवघड; स्वीकृत नगरसेवक पदासाठी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य

BJP candidate selection policy News : पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजप नेत्यांची 'लाडकी' मंडळी वेटिंगवर असली तरी पराभूत झालेल्या उमेदवारांना मागच्या दाराने संधी मिळणे अवघड आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचा पूर्व इतिहास पहिला तर निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या मंडळींना मागच्या दाराने संधी कधीच देत नाही. आतापर्यंत ही भूमिका भाजपने कायम ठेवली आहे. राज्यातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अनेक उमेदवार रिंगणात उतरले होते मात्र त्यांना बाजूला करीत नवख्या चेहऱ्यांना संधी दिली. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्याना भाजप कधीच विधानपरिषदेवर घेत नाही. त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली नाही. त्यामुळे उद्या पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजप नेत्यांची 'लाडकी' मंडळी वेटिंगवर असली तरी पराभूत झालेल्या उमेदवारांना मागच्या दाराने संधी मिळणे अवघड आहे.

नुकत्याच राज्यातील भाजपच्या (BJP) वाट्याला आलेल्या चार जागेसाठीच्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अनेक दिग्ग्ज मंडळी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांना दूर सारून नवख्याना संधी दिली आहे. हे उदाहरण ताजे आहे. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत संधी देऊन परबहुत झालेल्या मंडळींना कुठेच स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली नाही तर मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या मंडळींना संधी दिली नाही. त्यामुळे आता पुण्यात उद्या होत असलेल्या निवडीत भाजपमधील पराभूत उमेदवारांना संधी मिळणार नाही.

BJP Flag
BJP Politic's : भाजपचे 7 पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे; 'या' नेत्यांवर गटनेत्याची जबाबदारी!

पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी तिन्ही पक्षांत जोरदार चढाओढ सुरू आहे. सर्वाधिक सात स्वीकृत नगरसेवक सत्ताधारी भाजपच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. तर दोन नगरसेवकपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे तर एक पद हे काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. या पदासाठी जोरदार रस्सीखेच दिसत आहे. कॉग्रेसच्या (Congress) वाट्याला आलेल्या अवघ्या एका जागेसाठी 68 जणांनी दावा केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

BJP Flag
Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदी यंदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी देऊ नये, वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना, संधी न मिळालेल्यांना स्वीकृत नगरसेवक करावे, अशी मागणी कार्यकत्यांनी केली आहे. त्यामुळे ऐन निवडीच्या तोंडावरच इच्छुक मंडळींनी मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजपच्या हायकमांड पुढे नवे संकट उभे टाकले आहे.

BJP Flag
Congress News: भाजपचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; एकाचवेळी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

सांगली, कोल्हापूर येथील निवडीवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना निवडणुकीत पराभूत झालेल्या मंडळींना स्वीकृत नगरसेवक म्हणून मागच्या दाराने पुन्हा घेत संधी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्यांना जनतेने नाकारले आहे, त्यांना पुन्हा महापालिकेत सन्मानाने बसवणे हे लोकशाहीच्या तत्त्वाविरुद्ध आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. निवडणुकीत रात्रंदिवस राबणाऱ्या पण उमेदवारी न मिळालेल्या किंवा पक्षासाठी त्याग केलेल्या अभ्यासू , नव्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

BJP Flag
Jayant Patil on NCP Merger : 'राष्ट्रवादीचे विलीनीकरण आता सुतरामही शक्यता नाही,...', जयंत पाटलांनी कंडका पाडला

पुण्यातील स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये जोरदार स्पर्धा आहे. महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यातच पराभूत झालेल्यांनीही पक्षाकडे आग्रह धरला आहे. पराभूत उमेदवारांना संधी मिळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक नावांची चर्चा असली, तरी प्रदेश स्तरावरूनच यादी अंतिम होईल, असे सांगण्यात आले. पुण्यातील यादी प्रदेश भाजप कार्यलयाकडून रविवारी रात्री घोषित केली जाणार असल्याचे समजते. त्याकडे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

BJP Flag
Pune BJP : केंद्र सरकारच्या पुण्यातील 'त्या' प्रकल्पाला भाजप नगरसेवकांचा अडथळा, अंतर्गत राजकारणामुळे कोट्यवधींचा निधी परत जाण्याचा धोका

कार्यकर्त्याची उत्सुकता शिगेला

येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आता स्वीकृत सदस्य असणार आहेत. मात्र, भाजपकडून या निवडीवेळी देखील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मंडळींना संधी दिली जाणार नाही. त्याऐवजी निवडणुकीत रात्रदिवस राबणाऱ्या पण उमेदवारी न मिळालेल्या किंवा पक्षासाठी त्याग केलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

BJP Flag
BJP Politic's : भाजपचे 7 पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे; 'या' नेत्यांवर गटनेत्याची जबाबदारी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com