Shivsena News: संदिपान भुमरेंची मागणी, मराठवाड्यातील सर्वपक्षीय 13 खासदारांचा एका झटक्यात पाठिंबा जाहीर

Marathwada Politics: नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी केलेल्या मागणीला मराठवाड्यातील सर्व पक्षीय खासदारांनी आपले समर्थन देत मागणी लावून धरली.
Sandipan Bhumre Eknath Shinde    .jpg
Sandipan Bhumre Eknath Shinde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी केलेल्या स्वतंत्र रेल्वे मंडळाच्या मागणीला मराठवाड्यातील सर्व पक्षीय खासदारांनी आपले समर्थन देत मागणी लावून धरली. दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक नांदेड येथे आज संपन्न झाली. भुमरे यांनी विविध मुद्दे व मागण्यांवर चर्चा करतानाच मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ देण्याची मागणी केली. दक्षिण-मध्य रेल्वेकडून सातत्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. दक्षिणेतील अधिकारी मराठवाड्याला सापत्न वागणूक देतात, अशी टीका नेहमीच केली जाते.

या पार्श्वभूमीवर संदीपान भुमरे यांनी नांदेड येथे रेल्वे संदर्भातील बैठकीत मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करण्याची मागणी करताच इतर लोकप्रतिनिधींनी या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला. सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील प्रश्न बैठकीत मांडले. रेल्वे थांबे, डब्ब्यांची संख्या, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, दुहेरीकरण तसेच नव्या रेल्वे मार्गांना गती मिळावी, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली. परंतु दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही बहुतांश खासदारांनी केली.

खासदार अजित गोपछडे, शिवाजी कळगे, कल्याण काळे, रवींद्र चव्हाण, बळवंत वानखेडे, अशोक चव्हाण, संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, अनुप धोत्रे, बजरंग सोनावणे, रामराव वडकुते, ज्ञानेश्वर पाटील व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला हजर होते. मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग (रेल्वे मंडळ) स्थापन करण्यात यावा. यासाठी केंद्र शासनाकडे सविस्तर अहवाल व प्रस्ताव सादर करण्याची सूचना खासदार संदिपान भूमरे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना दिली.

या स्वतंत्र विभागामुळे प्रवासी सुविधा, पर्यटन, उद्योग तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. सध्या छत्रपती संभाजीनगर हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत कार्यरत आहे. स्थानिक गरजा व विकासकामांकडे सातत्याने दुर्लक्ष होते, यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळाची आवश्यकता आहे. जेणेकरून मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला गती मिळेल. मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन केल्याने सोयी सुविधा उपलब्ध होऊन सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास भुमरे यांनी बैठकीत व्यक्त केला.

Sandipan Bhumre Eknath Shinde    .jpg
Missing Link Landslide: ‘बिनशर्त पाठिंबा’ हा लोकशाहीमधला सगळ्यात धोकादायक प्रकार...; लोकप्रिय अभिनेत्याची जळजळीत पोस्ट; निशाण्यावर राज ठाकरे?

स्थानिक स्तरावर निर्णय प्रक्रिया सुलभ होऊन स्वतंत्र रेल्वे विभाग स्थापन झाल्यास स्थानिक पातळीवर त्वरित निर्णय घेणे शक्य होईल. नवीन रेल्वे प्रकल्प, देखभाल, नवीन रेल्वेगाड्या, प्रवासी सुविधा आणि विकासकामांवर अधिक प्रभावी नियंत्रण राहील. पर्यटन विकासाला चालना मिळेल, स्वतंत्र विभागामुळे पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढेल. पर्यटनस्थळांपर्यंत अधिक चांगली रेल्वे जोडणी निर्माण होईल आणि प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील.

उद्योग व मालवाहतुकीला गती मिळेल दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत शेंद्रा–बिडकीन परिसरात हजारो कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होत आहे. स्वतंत्र रेल्वे विभागामुळे मालवाहतूक, नवीन रेल्वे सायडिंग, पिट लाईन, माल टर्मिनल आणि औद्योगिक रेल्वे संपर्क सुविधा अधिक वेगाने विकसित होतील.

Sandipan Bhumre Eknath Shinde    .jpg
Missing Link Accident: मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या 'मिसिंग लिंक'ची 2 महिन्यांतच वाताहत; आदित्य ठाकरेंनी सगळा राग फडणवीस-शिंदेंवर काढला

स्थानिक रोजगार व प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होईल स्वतंत्र रेल्वे विभागामुळे नवीन कार्यालये, देखभाल केंद्रे आणि विविध रेल्वे आस्थापनांची उभारणी होईल. त्यामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल तसेच प्रवाशांच्या तक्रारींचे जलद निवारण करता येईल, अशी अपेक्षा भुमरे यांच्यासह मराठवाड्यातील इतर खासदारांनी व्यक्त केली.

मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला न्याय द्यायचा असेल, रेल्वे पायाभूत सुविधांची कमतरता दूर करायच्या असतील तर स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करण्याच्या मागणीवर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

स्वतंत्र रेल्वे विभाग स्थापन झाल्यास विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील इतर भागांप्रमाणे मराठवाड्याचाही रेल्वे विकास संतुलित व गतिमान होण्यास मदत होईल, असे भुमरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com