Farmers Protest : धुळे-सोलापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला; रवीराज साबळे, विवेकानंद पाटील आक्रमक; आयजी वीरेंद्र मिश्रांनाही कोंडीचा फटका

Raviraj Sable Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे या तरुणांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. दुतर्फा सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Farmers block the Dhule-Solapur highway
Farmers block the Dhule-Solapur highway sarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संतापाचा आज कडेलोट झाला. कोल्हापूरच्या धर्तीवर मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळावा या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी रस्त्यावर उतरले.

विवेकानंद पाटील, रविराज साबळे या तरुणांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. दुतर्फा सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र गेवराईजवळील पाडळशिंगी येथे पहायला मिळाले. याचा फटका विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनाही बसला.

मिश्रा हे बीडमध्ये महत्त्वाच्या बैठकीसाठी ते निघाले होते.आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहने उभी असल्याने बीडमधील त्यांच्या उपस्थित होणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या बैठका दोन तासांनी पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी टोलनाक्यावर रविराज साबळे आणि विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा महामार्ग रोखून धरला.

तब्बल दोन तास सुरू असलेल्या या आक्रमक रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, या आंदोलनाचा फटका विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हे या वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. दुष्काळाच्या छायेत होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविराज साबळे आणि विवेकानंद पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Farmers block the Dhule-Solapur highway
BJP leadership reviews ministers : विधान परिषदेमधील पराभव भाजपच्या जिव्हारी! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अ‍ॅक्शन मोडवर, 'ते' मंत्री निशाण्यावर, अहवाल...

कोल्हापूरच्या धर्तीवर आम्हालाही ४ हजार २०० रुपये भाव मिळालाच पाहिजे, तसेच संकटात सापडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसाठी हजारो शेतकरी आज पाडळसिंगी टोलनाक्यावर ठाण मांडून बसले होते. सरकारविरोधातील जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

सरकारने शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा रविराज साबळे व विवेकानंद पाटील यांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आयजींच्या ताफ्यालाही आंदोलनाचा 'ब्रेक'

​या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की, महामार्गावर वाहनांची चाके पूर्णपणे थांबली होती. दरम्यान, बीड येथे सुरू असलेल्या विभागीय परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हे बीडकडे येत होते. मात्र, पाडळसिंगी टोलनाक्यावरील शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे आणि वाहनांच्या कोंडीमुळे मिश्रा यांचा ताफा तब्बल एक तास महामार्गावरच अडकून पडला. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची मोठी पंचाईत झाली होती.

पोलिस प्रशासनाचे वेळापत्र कोलमडले

आयजी मिश्रा हे एक तास उशिराने पोहोचणार असल्याचे स्पष्ट होताच, बीडमधील त्यांच्या नियोजित महत्त्वाच्या बैठका आणि क्राईम मीटिंग पुढे ढकलण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शेतकऱ्यांच्या या दणक्यामुळे केवळ वाहतूकच नव्हे, तर सरकारी आणि पोलीस प्रशासनाचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडून पडल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.

Farmers block the Dhule-Solapur highway
Congress Defeats BJP : भाजपचा दारुण पराभव, काँग्रेसची 24 जिल्हा परिषदांवर सत्ता, पंचायत समितीमध्येही दणदणीत विजय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.