Arjun Khotkar : 50 खोके, एकदम ओकेची घोषणा देणारे गोरंट्याल भाजपवासी; आता किती खोके घेतले? खोतकरांचा वर्मी बसणारा प्रश्न

Gorantyal 50 Khoke statement News : भाजप प्रवेशानंतर महायुतीमधील मित्रपक्षातच ठिणगी पडली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मतभेद उघड होणार आहेत.
arjun khotkar, kailas gorntyal
arjun khotkar, kailas gorntyalSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर महायुतीमधील मित्रपक्षातच ठिणगी पडली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मतभेद उघड होणार आहेत. गोरंट्याल यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपच्या युती धर्मावरती सवाल उपस्थित केला आहे. ज्यांच्याकडे जनाधार राहिला नाही अशा लोकांना घेऊन भाजप काय करू इच्छिते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी सातत्याने टीका केली होती. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या रंट्याल यांनी भाजपमध्ये जायचे किती खोके घेतले? असा सवाल देखील खोतकर यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशा मागे कोण आहे? त्याला लवकरच उघड करु, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

arjun khotkar, kailas gorntyal
BJP Politics : 'संपूर्ण महाराष्ट्र भोंगे मुक्त करायचा', भाजप नेत्याने कंबर कसली

जालन्यातील काँग्रेसचे (Congress) माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जालन्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या प्रवेशावर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी टीका केली आहे. त्यासोबतच या प्रवेशावरुन त्यांना भाजपला देखील घेरले आहे. आमच्या मित्र पक्षाने विचार करायला हवा होता. अशा मंडळींना प्रवेश देऊन भाजप काय साध्य करत आहे? असा सवाल खोतकरांनी केला असून कदाचित भाजप नेत्यांना कैलास गोरंट्याल यांनी केलेले घोटाळे माहिती नसतील, असे खोतकर म्हणाले.

arjun khotkar, kailas gorntyal
Shivsena UBT : "टॅरिफ बॉम्ब अन् पाकड्यांसोबत डिल; मोदींचा मित्रच भारताचा गळा कापतोय..."

सोसायटीच्या निवडणुकीत आम्ही पाडलेय

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे चर्चा करणार आहेत. त्यांची बायको पाच वर्षे जालना नगरपालिकेची नगराध्यक्ष राहिलेली आहे. त्यांना जनतेने निवडून दिले आहे, मग तुम्हाला टीका सहन करावी लागणार आहे. यामुळे त्यांचा भ्रष्टाचार लपणार नाही, असेही खोतकर यांनी स्पष्ट केले. यापूर्वी साध्या सोसायटीच्या निवडणुकीत आम्ही गोरंट्याल यांना पाडल्याचे खोतकर म्हणाले.

arjun khotkar, kailas gorntyal
Devendra Fadnavis News: फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट,धनंजय मुंडे मला दोन नाही,तर तीनवेळा भेटले अन् त्यात मंत्रिमंडळाची...

भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले ?

यावेळी भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले ?असा सवाल देखील खोतकरांनी गोरंट्याल यांना केला. ज्या लोकांनी तुला मतदान केले त्यांना तू गद्दार झाल्याचे खोतकर म्हणाले. या प्रवेशा पाठीमागे कोण आहे त्यांना काही दिवसांनी आम्ही उघड करु. हे स्थानिक षडयंत्र आहे, गोरंट्याल यांना काही स्थानिकच्या मंडळींनी उचकवले असल्याचे त्यांनी सांगितले.

arjun khotkar, kailas gorntyal
Eknath Shinde pressure : कोकाटेंचं खातं बदलताच शिंदेंवर प्रेशर वाढलं : गोगावले, शिरसाट, कदमांवर राहणार मुख्यमंत्र्यांचं लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com