CM Devendra Fadnavis News : चंद्रकांत खैरेंनी धरले मुख्यमंत्री फडणवीसांचे बोट

Discussions during Khaire-Fadnavis meeting : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट झाली. जिल्ह्यातील पक्षाची सगळी सुत्रं अंबादास दानवे यांच्या हाती गेल्याने चंद्रकांत खैरे पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे.
CM Fadnavis-Khaire news
CM Fadnavis-Khaire newsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस काल छत्रपती संभाजीनगर येथे एका लग्न समारंभात सहभागी झाले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या मुलाच्या लग्नात उपस्थितीत राहून मुख्यमंत्र्यांनी वधु-वरास आशिर्वाद दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांना सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या नेते, आमदार व कार्यकर्त्यांचा गराडा होता. यात अनेक गंमती-जमती घडल्या.

विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आवर्जून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भगवी शाल देऊन त्यांच्या सत्कार केला आणि बराच वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली. व्हीआयपी कक्षातील भोजनाच्यावेळी खैरे फडणवीसांना भेटले. हस्तांदोलन करत खैरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. खैरे-फडणवीस यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

CM Fadnavis-Khaire news
Shivsena News : खातेवाटपावरून शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मंत्रिपदाचे वाटप करताना...'

शिवसेना-भाजप युती आणि राज्यात सरकार असतांना खैरे-फडणवीस यांच्यात चांगले संबध होते. पक्ष फुटीनंतर या दोघांमध्ये फारसा संवाद झाला नाही. उलट खैरेंनी त्यांच्यावर टीकाच केली. पण (Devendra Fadnavis) फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात आल्यानंतर खैरे यांनी मतभेद विसरून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

CM Fadnavis-Khaire news
Devendra Fadnavis : महायुतीचा विजय अन् 'ईव्हीएम'वर शंका घेणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी मोजक्या शब्दांत फटकारले

लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट झाली. जिल्ह्यातील पक्षाची सगळी सुत्रं अंबादास दानवे यांच्या हाती गेल्याने चंद्रकांत खैरे पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे. एकीकडे महायुती भक्कमपणे शहरात आणि मराठवाड्यात पाय रोवत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत मात्र कुरबुरी आणि कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.

CM Fadnavis-Khaire news
BJP Maharashtra : विधानसभेत भाजपच्या यशाचं गमक काय? संघटन अन् व्यवस्थापन कौशल्य...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जिल्ह्यात खैरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महत्व देत त्यांना सगळे अधिकार दिले आहे. त्यामुळे खैरे विधानसभा निवडणुकीत म्हणावे तितके सक्रीय दिसले नाही. खैरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. पक्ष फुटीनंतर अनेकांच्या नावाच्या चर्चा पक्षातून भाजपमध्ये जाणार म्हणून झाल्या. पण खैरेंच्या निष्ठेवर कोणीही शंका उपस्थितीत केली नाही.

CM Fadnavis-Khaire news
Marathwada Assembly Election : ईव्हीएमवर भरवसा नाय काय ? मराठवाड्यातून फेरमतमोजणीसाठी नऊ जणांचे अर्ज

परंतु लोकसभा निवडणुकीत सलग दोन पराभव, विधानसभेत पक्षाला आलेले अपयश आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून साईड ट्रॅक केल्याची भावना खैरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. अशावेळी खैरे आणि फडणवीस यांची काही मिनिटांची झालेली ही भेट नव्या चर्चेला कारण ठरत आहे. हस्तांदोलन करतांना खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे बोट धरल्याचे दिसत आहे. आता याचा नेमका अर्थ काय? की ही भविष्यातील नव्या राजकारणांची नांदी ठरणार आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com