Kolhapur DCC Bank election : कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा बँकेतील गेम मंत्र्यांनी फिरवला; 18 सहकारी संस्थांवर संचालक मंडळाला मुदतवाढ, मंत्रिमंडळात मंजुरी

Hasan Mushrif gets extension dcc bank election News : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 5 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच बँकेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता होती.
Kolhapur District Central Cooperative Bank election
Kolhapur DCC Bank Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : राज्यातील 18 अ वर्गातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या 18 संस्थांवर प्रशासक नियुक्ती होणार नाही, अशास्वरूपाचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा बँक व जवळपास 18 सहकारी संस्थांवर संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेम फिरवला असून हा निर्णयाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 5 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच बँकेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता होती. त्यासाठी निवडणुकीची अंतिम मतदार यादी मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील 18 सहकारी बँकेच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता.

त्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेवर देखील प्रशासक मंडळ येण्याची शक्यता होती. मात्र, मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी डाव टाकला आहे. राज्य सरकारच्या या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा बँकेवर देखील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार आहे.

Kolhapur District Central Cooperative Bank election
District Cooperative Banks : जिल्हा बँकांतील सहकार सम्राटांना दणका! काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 100 हून अधिक नेत्यांची कोंडी; भाजपाला मात्र नवी संधी

राज्यातील 18 अ वर्गातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे स्थगिती करण्यात आलेल्या 18 संस्थांवर प्रशासक नियुक्ती करण्यात येणार नाही. मुदत संपलेल्या अ प्रकारातील आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित अशा अठरा संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये कलम ७३ अअअ (३) परंतुकातील महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.

Kolhapur District Central Cooperative Bank election
District Bank Election : सहकार क्षेत्रात मोठी घडामोड! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीला ब्रेक, दुष्काळामुळे अंतिम मतदार यादी लांबणीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.