Rekha Gaikwad : लातूरच्या आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड निवृतीच्या पंधरा दिवस आधीच कार्यमुक्त; डॉ.सतीशकुमार सोळंके यांच्याकडे पदभार

Latur Health Department News: लातूरच्या आरोग्य उपसंचालिका डॉ. रेखा गायकवाड यांना प्रशासकीय अनियमिततेच्या चौकशीनंतर पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला.
Latur health deputy director Dr Rekha Gaikwad
Latur health deputy director Dr Rekha Gaikwad Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Latur Health Department News: लातूर आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालिका डॉ.रेखा ना. मुदखेडकर (गायकवाड) यांच्या कार्यकाळातील बदल्या, नियुक्त्या, पदोन्नती आणि प्रशासकीय कामकाजाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्रशासकीय नियमांचे उल्लंघन आणि अनियमितता निष्पन्न झाल्यामुळे, शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार त्यांना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी लातूर मंडळाच्या उपसंचालक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगतानाच एमपीएसपी प्रकरणात आपण गंभीर खुलासे करणार होतो, म्हणून आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. ​दरम्यान, या धडाकेबाज कारवाईमुळे रिक्त झालेल्या लातूर आरोग्य उपसंचालक पदाचा अतिरिक्त कारभार आता बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार मधुकर सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

याबाबतचे अधिकृत आदेश राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय श्रीपतराय काटकर यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केले आहेत. लातूर मंडळांतर्गत लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. उपसंचालक पदावरील या बदलामुळे या तीनही जिल्ह्यांतील आरोग्य सेवांचे नियंत्रण आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत कोणताही खोळंबा होऊ नये, यासाठी आयुक्तालयाने तातडीने सूत्रे हलवली.

Latur health deputy director Dr Rekha Gaikwad
Shirur: शिरूर बाजार समिती निवडणुकीला ब्रेक : आणखी सहा महिने पुढे ढकलण्याचा आदेश; जुने मतदार ठरणार बाद

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २५ जून २०२६ रोजीच्या शासनपत्राने आयुक्तालयास प्रदान केलेल्या अधिकारानुसार हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉ.सतीशकुमार सोळंके यांनी आपल्या मूळ पदाची (जिल्हा शल्यचिकित्सक, बीड) जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळून लातूर मंडळाच्या आरोग्य उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ स्वीकारून त्याचा अहवाल सर्व संबंधित वरिष्ठांना सादर करावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांच्या आदेशात देण्यात आले आहेत.

Latur health deputy director Dr Rekha Gaikwad
Devendra Fadnavis : CM फडणवीसांकडून पुण्यातील नगरसेवकांची शाळा; लोकप्रतिनिधींचही मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं! बैठकीतील Inside Story

कारवाई अन्यायकारक म्हणत, खळबळजनक दावे..

आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगतानाच एमपीएसपी प्रकरणात आपण गंभीर प्रकरणे उजेडात आणणार होतो, म्हणून आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा गायकवाड यांनी केला आहे. डॉ. गायकवाड यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या, प्रतिनियुक्त्या, पदोन्नती, रुग्णालयांना दिलेल्या तांत्रिक मंजुऱ्या, औषधे व वैद्यकीय उपकरणांची खरेदी तसेच आर्थिक व्यवहार यांचा समावेश होता.

चौकशीत अनेक बाबींमध्ये तफावत आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याशिवाय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) झालेल्या त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या नियुक्तीबाबतही कारवाई झाली. दरम्यान, या कारवाईनंतर डाॅ. रेखा गायकवाड यांनी खुलासा करताना अनेक आरोपही केले आहेत. एमपीएससीमधील कथित घोटाळा उघड करण्याच्या तयारीत असल्यामुळे आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com