Madhavrao Patil Jawalgaonkar : अशोक चव्हाणांसोबत गेलो असतो, तर आज आमदार असतो; माजी आमदाराला काँग्रेसमध्ये राहिल्याची खंत

Former Congress MLA Madhavrao Patil Jawalgaonkar hints BJP entry, creating major political buzz Hadgaon constituency Nanded district : काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका सभेत कार्यकर्त्यांशी बोलताना जवळगावकर यांनी काँग्रेसमध्ये राहिल्याची खंत व्यक्त केली.
Madhavrao Patil Jawalgaonkar
Madhavrao Patil JawalgaonkarSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : माधवराव पाटील जवळगावकर यांच्या एका वक्तव्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे माजी आमदार असलेले जवळगावकर आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना अचानक वेग आला असून त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

एका जाहीर सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माधवराव पाटील जवळगावकर यांनी काँग्रेसमध्ये (Congress) राहिल्याबद्दल उघडपणे खंत व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशोक यांच्यासोबत भाजपमध्ये गेलो असतो, तर आज आमदार राहिलो असतो. मात्र त्या वेळी काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांच्या या विधानाने काँग्रेससह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.

विशेष म्हणजे, आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा अंतिम निर्णय त्यांनी थेट कार्यकर्त्यांवर सोपवला आहे. यासाठी 26 जून रोजी हदगाव (Nanded) येथे महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीतच त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Madhavrao Patil Jawalgaonkar
Shiv Sena Leader Fraud Case : एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा कारनामा; तीन मृत व्यक्ती जिवंत दाखवत जमीन लाटली, पोलिसही चक्रावले

दरम्यान, नांदेडच्या राजकारणात आधीच अनेक चर्चांना उधाण आले आहे. नागेश पाटील आष्टीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांमुळे वातावरण तापलेले असतानाच आता माधवराव पाटील जवळगावकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.

Madhavrao Patil Jawalgaonkar
Anna Hazare Hunger Strike : सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणाला बसणार! 90व्या वर्षीही अण्णा हजारे यांचा फडणवीस सरकारला थेट इशारा

माधवराव पाटील जवळगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार की काँग्रेसमध्येच कायम राहणार, याचा निर्णय आता 26 जूनच्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हदगाव विधानसभा मतदारसंघात पुढील काही दिवसांत मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com