Parbhani Zp Election: शिवसेनेचा गेम! परभणी झेडपीत भाजप-राष्ट्रवादीने ठेवले सत्तेपासून दूर!

Parbhani Zilla Parishad: अध्यक्षपद भाजपाला, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा तर शिवसेनेला महत्त्वाचे सभापती पद असा फाॅर्म्युला ठरला. पण काही तासातच हे चित्र बदलले आणि भाजप-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेलाच सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी केली.
prabhani zp
prabhani zp Sarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

Mahayuti News : परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजप-राष्ट्रवादीने हातमिळवणी करत ऐनवेळी शिवसेनेचा घात केला. दोन दिवसापुर्वी परभणी जिल्हा परिषदेत महायुतीने एकत्र काम करण्याचा निर्णय झाल्याचे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मुंबईतून जाहीर केले होते. अध्यक्षपद भाजपाला, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा तर शिवसेनेला महत्त्वाचे सभापती पद असा फाॅर्म्युला ठरला. पण काही तासातच हे चित्र बदलले आणि भाजप-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेलाच सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी केली.

परभणी झेडपीत अशा प्रकारे खेळ मांडल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) मित्र पक्षावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यामुळे मात्र भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षपदावर भाजपाच्या लता वाकळे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर यांची वर्णी लागली. एकमेकांना सोबत न घेण्यासाठी हट्टाला पेटलेल्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी सत्तेसाठी शिवसेनेचाच गेम केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

prabhani zp
Shiv Sena withdrawal Sangli ZP news : सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेची तासाभरातच माघार : अध्यक्षपदासाठी पाटील विरुद्ध मासाळ तर उपाध्यक्षपदासाठी लाड-जाधव भिडणार!

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने (BJP) 24 जागांसह आघाडी घेतली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6, शिवसेना 5, काँग्रेस 3 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. या निकालानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिवसेनेसोबत युती असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्याचे संकेत दिले होते.

prabhani zp
sindhudurg politics : राणे विरूद्ध चव्हाण वाद? नितेश राणेंच्या संतापाचा कडेलोट; विरोधकांना इशारा देत म्हणाले, 'काड्या' लावून आपली...

भाजप (24) आणि शिवसेना (5) असा आकडा गाठत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय डाव साधत शिवसेनेला अध्यक्षपदाचे आमिष दाखवले. त्यानुसार राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि अपक्ष यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. राजकीय समीकरणे जवळपास जुळून येत असतानाच 17 मार्चच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर अचानक हालचाली झाल्या आणि पक्षाने थेट भाजपसोबत हातमिळवणी केली.

prabhani zp
Sushma Andhare Allegations Rupali Chakankar : राजकारण्यांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सुषमा अंधारे यांचे चाकणकरांकडे बोट; काय आहे प्रकरण?

या नाट्यमय घडामोडीत भाजपचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष असा फॉर्म्युला अंतिम झाला. या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत उपाध्यक्षपद मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान, अध्यक्षपदाच्या हव्यासापोटी शिवसेनेच्या हातून उपाध्यक्ष पदाची संधीही निसटली. परिणामी, पक्ष पूर्णपणे सत्तेबाहेर फेकला गेला आहे.

prabhani zp
Modi Shah political strategy : मोदी-शहांचे पुन्हा धक्कातंत्र; मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बदलणार? घडामोडींना वेग...

या घडामोडींवर शिवसेनेत संताप उसळला असून संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी राष्ट्रवादीवर तीव्र टीका केली. राजेश विटेकर यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर भाजपनेही विश्वासघात केल्याचा दावा त्यांनी केला. परभणी जिल्हा परिषद सत्तास्थापनेतील या नाट्यमय घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून मित्र-शत्रूच्या सीमारेषा किती झपाट्याने बदलू शकतात याचे हे ताजे उदाहरण ठरले आहे.

prabhani zp
Sangli ZP President : सांगली झेडपी अध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट, महाविकास आघाडीकडून संगिता पाटलांना उमेदवारी, ठाकरेंच्या उमेदवाराची बंडखोरी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com