Satara Politic's : 'कृष्णा’च्या विजयाची चावी माजी मुख्यमंत्री, तीन आमदार, एका माजी आमदाराच्या हाती!

Krishna Sugar Factory Election 2026 : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकारण तापले असून दोन प्रमुख गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.
Krishna Sugar Factory Election 2026
Krishna Sugar Factory Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 17 May : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे कृष्णाकाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले गट विरुद्ध अविनाश मोहिते गटाच्या दोन पॅनेलमध्येच लढत होईल, अशी चिन्हे आहेत. त्यासाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणीही केली आहे. मात्र या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार बाळासाहेब पाटील, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधणाऱ्या रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची (Krishna Sugar Factory) निवडणुक २१ जूनला होत आहे. सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूक दरवेळी राज्यात गाजते. कृष्णाकाठचे राजकारणच प्रत्येक निवडणुकीत बदलते.

कृष्णाच्या २०२१ च्या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. भोसले, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांचे जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल अशी तिहेरी लढत झाली. त्यात सत्ताधारी डॉ. भोसलेंच्या पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकुन वर्चस्व राखले.

सध्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने आणि सोमवारपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याने कारखान्यातील सत्ताधारी भोसले गट आणि त्यांच्या विरोधी अविनाश मोहिते गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. या वेळच्या निवडणुकीसाठी ५० हजार २५२ सभासद असून ते कृष्णेच्या सत्तेचा फैसला करणार आहेत.

कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे गट सक्रीय आहेत. ते या निवडणुकीत निर्णायक ठरु शकतात. माजी मंत्री जयंत पाटील हे वाळवा-ईश्वरपूरचे आमदार आहेत. कृष्णाचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सभासद असून ते इश्वरपूर मतदारसंघात आहेत. त्यांच्याच मतदार संघातील रेठरे हरणाक्ष-बोरगाव आणि नेर्ले-तांबवे गटातून संचालक निवडणुकीत असतात.

Krishna Sugar Factory Election 2026
NCP Crisis : पार्थ पवारांनी घेतली CM फडणवीसांची भेट : तटकरे-पटेलांच्या भवितव्याबाबत चर्चा?

शिराळा मतदारसंघातील काही गावांत कृष्णेचे सभासद आहेत. इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील ३९ गावांत कृष्णेचे सभासद आहेत. यामुळे जयंत पाटील यांच्या भूमिकेला कृष्णेच्या निवडणुकीत महत्व असते. आमदार विश्वजित कदम यांच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील २१ गावांमध्ये कृष्णेचे सभासद आहेत. त्यांच्या भारती विद्यापीठ व इतर संस्थांचे जाळे कृष्णेच्या कार्यक्षेत्रात आहे. कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोग घोरपडे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कऱ्हाड उत्तरमधील १० गावांत कृष्णेचे सभासद आहे. त्यामुळे या सर्वच नेत्यांची भुमिका निवडणुकीत महत्वाची ठरेल.

Krishna Sugar Factory Election 2026
Pune road accident : ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाच्या फॉर्च्युनरची रिक्षाला जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू

स्थानिक राजकीय समीकरणे प्रभावी ठरणार

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत थेट दोन गट समोरासमोर येण्याची चिन्हे असली, तरी पडद्यामागील राजकीय गणिते अधिक महत्वाची ठरणार आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्थानिक गटांचे प्रभावक्षेत्र विभागले गेले आहे. त्यामुळे केवळ पॅनेलची ताकद नव्हे, तर कोणत्या नेत्याचा आशीर्वाद कोणाला मिळतो, यावरही निकालाची दिशा ठरणार आहे. विशेष म्हणजे, कृष्णाच्या निवडणुकीत ऊसदर, सभासदांचे प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक राजकीय समीकरणे हे मुद्दे प्रभावी ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com