Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांना मोठा धक्का! जवळच्या सहकाऱ्याचं 'ते' जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

Sanjay Katare Sand Mining Case: अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कटारे यांना दंडाच्या कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश रद्द करण्यात आला आहे. यामुळे कटारे यांच्यावरील 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड पुन्हा कायम झाला आहे.
Manoj Jarange Patil associate old case
Manoj Jarange Patil associate investigationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalna News, 28 Sep : मराठा आरक्षणाच्या आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवरील कारवाई आणि चौकशीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांच्याशी संबंधित जुन्या वाळू उत्खनन प्रकरणाला पुन्हा वेग आला आहे.

अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कटारे यांना दंडाच्या कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश रद्द करण्यात आला आहे. यामुळे कटारे यांच्यावरील 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड पुन्हा कायम झाला आहे. ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी 21 सप्टेंबर रोजी यासंदर्भात आदेश दिला.

नेमकं प्रकरण काय?

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून सुमारे 2 हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात 18 जणांवर महसूल विभागाने कारवाई केली होती. त्यांच्यावर एकूण 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

Manoj Jarange Patil associate old case
Gokul Election : गोकुळच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना सुनावलं; म्हणाले, "कोरे आणि तुम्हीच ठरवा..."

मात्र, संजय कटारे यांनी आक्षेप घेतल्यानंतर तत्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या नावाचा दंडाच्या कारवाईतून समावेश काढून टाकला. त्यामुळे कटारे यांना या दंडातून वगळण्यात आले होते. या निर्णयावर अजय महाराज बारस्कर यांनी आक्षेप घेत महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तत्कालीन तहसीलदारांसह गौण खनिज शाखेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही नोंद घेण्यात आली.

Manoj Jarange Patil associate old case
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर राऊतांचा गंभीर आरोप; ‘वसुली’ची तक्रार थेट फडणवीसांकडे

तहसीलदारांचा आदेश रद्द

चौकशीनंतर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कटारे यांना दंडातून वगळण्याचा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश रद्द केला. तसेच गट क्रमांक 262 वरील 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा बोजा पूर्ववत करण्यात आला आहे. ही रक्कम महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय कटारे यांना दंडातून वगळण्याचा आदेश काढणारे तत्कालीन तहसीलदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या काही जवळच्या सहकाऱ्यांशी संबंधित चौकशीचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com